१३६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण टोळीत असावे. परंतु हा विचार शत्रूनेही मनांत वागविला पाहिजे, तो न वागवील तर आपणास लढाईस उभे राहणे भागच पडते. साम झणजे शिष्टाईच्या व नीतीच्या चार गोष्टी सांगून शत्रूशी सख्य करणे, हा उत्तम उपाय, कारण ह्याने उभयपक्षांचा आब राहून कोणच्याही प्रकारची हानि होत नाही. संपदान झणजे देणगी देऊन शत्रूशीं सल्ला करणे, हा उपाय मध्यम, कारण, या उपायाने देणगी देणारास लघुत्व येते. ही देणगी अनेक प्रकारची असते, त्यांत द्रव्यरूपाने जी देणगी देतात, तीस खंडणी असें ह्मणतात. भेद झणजे फितूर हा निःकृष्ट उपाय होय, कारण त्यांत कुटिलता मात्र असते. शूरास व संभावितास शोभण्यासारखी मर्दुमकी अगर सुजनता बिलकुल नसते. | मागे सांगितलेल्या शत्रूच्या चतुर्विध प्रकारांपैकी उच्छेद्यशत्रु, सामदानादि उपायांस अयोग्य असून दृढतर निग्रहासच पात्र असे समजावे. पीडनीय व कर्षणीय शत्रु निर्मूलन करण्यास अनुक्रमें अशक्य व अयोग्य असल्यामुळे, संपदान व सौम्योपचार ह्यांस योग्य होत. बहिरायात । १ साम्ना दानेन भेदेन समस्तैरथवा पृथक् । साधितं प्रयतेतारीन्न, युन कदाचन ।। हितोपदेश. नहि युद्धं प्रशंसन्ति सर्वावस्थमरिन्दम ।। २ ।। उद्योग, अ०५८
पान:व्यवहारपद्धति.pdf/149
Appearance