१३२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण जात नाही. यास्तव व्यवहारसंपन्न गृहस्थाने अत्यंत क्षमाशील असू नये. ज्याला कधीही राग येत नाहीं, व जो नेहमीं क्षमाशील असतो, तो खीही नव्हे, आणि थंड पुरुषही नव्हे. अशा अक्रोधी व क्षमाशील पुरुषाची सर्व लोक अर्वगणना करीत असतात. सर्वच काल शान्तिब्रह्म होऊन बसणे, किंवा सर्व काल क्रोधवृत्ति धारण करणे, हे व्यवहारी पुरुषास योग्य नव्हे. सदां शान्तिनिष्ठ पुरुषाची लोक अवज्ञा करितात. व सदां क्रोधी असणा-या पुरुषापासून लोक उद्वेग पावतात. याकरिता क्षमा वं शांति केव्हां धरावी, व क्रोध केव्हा करावा, हैं ज्यास चांगले समजते, तोच मोठेपणा पावतो. मुद्दाम अपकार करून तो न समजता झाला, असे खोटसाळ प्रतिपादन करणा-या शठांची कधीही उपेक्षा १ एतावानेव पुरुषो यमर्षी यक्षमी । क्षमावान्निरमर्षश्च नैव स्त्री न पुनः पुमान् ॥ ३३ ॥ उद्योगपर्व, अ० १३३. | २ निर्मन्युश्याप्यसंख्येयः पुरुषः क्लीवसाधनः ।। ६ ।। उद्योग. अ० १३३. ३ यो नित्यं समते तात बहुदोषान्सविंदति । भत्याः । परिभवन्त्येनमुदासीनास्तथारयः ।। ७ ।। वनपर्व, ४ मृदुभवत्यवज्ञातस्तीक्ष्णाहुजिते जनः । काले प्राप्ते ( अ०२८ इयं चैनद्यो वेद स महीपतिः ।। ३७।। ५ अथ ये बुद्धिजं कृत्वा वयुस्तेतदबुद्धिजं । पापान्स्वल्पेपि तान्हन्यादपराधे तथानृजन ।। २८ ।। वनपर्व, अ० २८.
पान:व्यवहारपद्धति.pdf/145
Appearance