Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे. ] शत्रु व त्यांची प्रतिक्रिया. १२७ धिकार फारच संकुचित असतो, व दुस-याचा अतिविस्तृत असतो, या वैगुण्यामुळे त्या दोघांच्या व्यवहारांत कांहीं भिन्नत्व असणारच, यास्तव ते भिन्नत्व , ध्यानीं आणून पुढील विवेचनांतील तात्पर्यार्थावर लक्ष । यावे, केवळ शब्दार्थावर भिस्त ठेवू नये. शत्रु हे उच्छेद्य, पीडनीय, कर्षणीय, व बहिरायात असे चार प्रकारचे असतात. अंगीं पराक्रम नाहीं, आप्त सोयरे व सेवक ह्यांचे साह्यही जितक्यास तितकेंच, द्रव्यबलही यथा तथा, असा बलहीन शत्रु उच्छेद्य समजून त्याचे समूळ उत्पान करावे. त्यासहवर्तमान सहसा संधी करू नये. कारण, मित्रही एकवार वैर करण्यास सिद्ध झाला असता त्याशीं देखील तडजोड करून संधी करणे, झणजे मृत्यूलाच बोलावून आणण्यासारखे आहे, मग वैग्याविषयी जास्त काय सांगावे. तसेच आपणाहून जो बलिष्ठ, ज्याशी सामना देऊन लढाईस उभे राहिले असतां, आपला निभाव लागणार नाही, नाशच होईल, असा जो शत्रु तो पीडनीय समजून त्याशीं साक्षात् सामना न देतां, संधी | १ हीयमानेन कर्तव्यों राज्ञा संधिः स मेन च । न शत्रुमवमन्येत ज्यायान्कुर्वीत विग्रहम् ।। १० ।। रामायण. युद्ध. सर्ग ३५. ३ सकृद् दुष्टं तु या मित्र पुनः संधातुमिच्छति । स मृत्युमेव गू हाति गर्भमश्वतरीयथा ।। हितोपदेश