या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
॥ श्री ॥ व्यवहारपद्धति. | ॥ जे इच्छितात अपुल्या प्रिय बालकांस ॥ ॥ राष्ट्रीय उन्नत सुशिक्षण द्यावयास ॥ ॥ त्यांनी प्रपंच, परमार्थ व शिष्टरीती ॥ ॥ आहे मुलांस उचित प्रतिपादणे ती ॥ प्रकरण पहिले. नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. विषयांतःप्रवेश, नीतीचे स्वरूप, तिचे प्रकार, सामान्य नीति, राजनीतित्यांची उपयुक्तता, कुटुंब व राज्य यांचे सादृश्य, पुरुषार्थविचार, त्यांचा परस्पर अनुबंध, सद्तैनास आवश्यक सद्भुण, नित्य कृत्यांत कालाची वाटण, ती ठरविण्याचे सामान्य विचार. 0:- गृहस्थमात्रास आपला पपंचव्यवहार नीटनेटका करितां येणे अत्यावश्यक आहे. याकरितांच श्रीसमर्थांनी ‘आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका असा उपदेश केला आहे. प्रपंचांत ऐहिक, पारमार्थिक,