प्रकरण चौथें. शत्रु व त्यांची प्रतिक्रिया. 20- 0- --- हेर व त्यांचे प्रकार-गुप्तहेर ( चार ), प्रकट हेर ( दूत ), निकृष्टार्थदूत ( वकील ), मितार्थदूत (हेजीब ), वातहरत (जासूद ), शत्रु व त्यांचे प्रकार-उच्छेद्य शत्रु, पीडनीय शत्रु, कर्षणीय शत्रु, बोहरायात शत्रु, वैरनियाँतनाचे उपाय-साम, दान, भेद, निग्रह, गृहस्थास शस्त्रयुद्ध अविवाहित, गृहस्थांस खर्चाची लढाई मात्र उचित, सामान्य विचार. परपक्षाकडील भेद घेण्यास योजावयाच्या हेरांचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार गुप्तहेर, यांस चार किंवा प्रणिधी असे ह्मणतात. यांनी नानात-हेच्या वेषांनी व बहाण्यांनी आपले स्वरूप प्रकट होऊ न देतां, शत्रूच्या आसमंतात राहून त्या कडील खडानखडा बातमी आपले योजकास देत असावी, हे ह्यांचे काम आहे. वास्तविक झटलें तर इतकें नाजूक काम ज्याचे त्यानेच सावधपणाने करावे, हे खरे. परंतु ६ शंकाभिःसर्वमाक्रान्तम् ?” हा विचार ध्यानी आणिला झणजे ह्या कामाची स्थलमर्यादा फार विस्तृत आहे, अशी खात्री होऊन ते आपले आपण करणे, झणजे गगनाला गवसणी
पान:व्यवहारपद्धति.pdf/133
Appearance