Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ व्यवहारपद्धति. | [ प्रकरण राज्यास आह्मी जिवापाड जपतच आहों. आपण तर महाराजांचे आप्तच आहा. यासमय थोरपणा केल्यास आपली कीर्ति होऊन स्वराज्य बचावेल. हे ऐकून शिर्के ताळ्यावर आले, आणि सणाले की, तुह्मांस थोरल्या महाराजांनी दाभोळच्या देशमुखीचें वतन दिले आहे, ते आपण आह्मांस द्याल, तर आह्मीं आपलें ह्मणणे मान्य करून, राजारामसाहेबांस किल्लयांतून निघून जाण्यास मार्ग देऊ. आह्मी मराठे आहों, मराठी राज्य कसेही सुटावे व वृद्धीस जावे, हेच आह्मांस श्रेयस्कर आहे. पुढे परंपरेनें कार्यास तेच येतील. मुसलमान आमचे कार्यास किती दिवस येणार ! ह्यावर चिटणीसांनी उत्तर केले की, स्वामी कार्याहून वेतन काय जास्त आहे, आझांस स्वामीहून जीवितही अधिक नाहीं. स्वामीचे पाय हेच आमचे सर्व अर्थ आहेत. अशा रीतीने राजकारण सिद्ध झाल्यावर शिर्के यांस दाभोळच्या वतनाच्या सनदा करून देऊन, एके दिवशी रात्री चिटणिसांनी राजारामसाहेबांस किल्लयांतून गुप्तरूपे काढून सुरक्षितपणे स्वदेशी आणिलें, व पुन्हा स्वराज्याचा बंदोबस्त केला. वरील गोष्टीवरून पिढीजादे व कुलीन सेवक अपकार न आठविता उपकारच स्मरतात, हे स्पष्ट दिसून येते. फार काय सांगावे, त्यांचे पुत्रपौत्र देखील अनाची