३ रें. ] बलाबल विचार. ११३ कापडी लिंगाईत इत्यादिकांपमाणे दिसतात खरे, परंतु ते कोणीतरी मोठे लोक असावेत. हे त्यांचे भाषण, महाराजांकडील कोणी एका इसमास कानडी येत होते, त्याने ऐकिलें. तेव्हां खंडो बल्लाळ यांनी संताजी घोरपडे, धनाजी जाधव, व खंडेराव दाभाडे इत्यादि बरोबरच्या मंडळीस सांगितले की, या गांवीं मोंगलांची चौकी आहे, त्या चौकीवाल्यांच्या कानी हा गांवक-यांनी केलेला अंदाज गेला कीं, मोंगलांचे धरणे येईल, याकरितां, तुह्मी सर्वजण महाराजांस घेऊन या क्षणी वाट फुटेल तिकडे चालते व्हा, आह्मी थोड्या लोकांसहवर्तमान तळावर राहतों, झणजे तुमचा पाठलाग होणार नाहीं. ही मसलत सर्वीस मान्य होऊन महाराज व कांहीं मंडळी ताबडतोब निघून गेली. इतक्यांत मोंगलांचे धरणे आले. त्यांनी खंडो बल्लाळ व इतर तळावर राहिलेल्या इसमांस राखेचे तोवरे देऊन चाबकांनी फोडून काढिले, तरी कोणी कबूल आला नाही. दुसरे लोक कोठे गेले ह्मणून विचारता, त्यांस जाणे होते तिकडे गेले, आझांस दुसरीकडे जाणे, सबब आह्मी राहिलों, असे सांगितले. तेव्हा हे यात्रेकरूच आहेत, अन्य कोणी असते तर, मारझोडीने १ मल्हार रामरावकृत थोरले राजारामसाहेब यांचे चरित्र पान २९ पहा.
पान:व्यवहारपद्धति.pdf/126
Appearance