Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ व्यवहारपद्धति. [ प्रकरण सतां जो आपल्याशी प्रेम भावाने वागतो, तोच खरा मित्र, व तोच खरा हितकर्ता, त्याच्या अनुरोधाने आपण वागत असावे. अशा प्रकारचे केवळ निरपेक्षबुद्धीने व मनाच्या उदारपणामुळेच बनलेले मित्र अनुचित गोष्टीस मर्जीचा कल पाहून रुकार देत नाहींत, साह्य करण्याची लटकी हमी भरून चढीस लावीत नाहींत. कडू लागेल ह्मणून खरे बोलण्यास भीत नाहीत, व वांकडे पाऊल पडत असतां शेंडी धरून मागे ओढण्यास कचरत नाहीत, असे जिव्हाळ्याचे व सन्मार्ग दर्शक मित्र ज्यांस सुदैवाने लाभतात, त्यांस विजय व लक्ष्मी हात जोडून वश होत असतात. सेवक बलाविषयी पूर्व प्रसंगी ब-याच विस्ताराने विचार झालेलाच आहे, तथापि प्रस्तावक्रमाचा भंग न । व्हावा ह्मणून येथे तत्संबंधे थोडेसे विवरण करितों. सेवक तीन प्रकारचे असतात, पहिले हंगामी, दुसरे वेतनी, व तिसरे वतनी. जे नोकर कार्य उपस्थित झाल्यावर तेवढ्याच कामाकरितां ऐत्या वेळेस गोळा केलेले || केशग्रहणान्त्रिमकार्यत्संनिवर्तयन् । अवाच्यः कस्यचिद्भवति कृतयत्न यथा बलम् ।। १३ उद्योग. अ० ९३ किं दानमनाकांक्षे, किं मित्रं यन्निवर्तयति पापात् (प्रश्नोत्तरमाला श्रीमच्छंकराचार्य.)