Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रें. ] बलाबल विचार. १०३ । होत असतो. त्यांस कितीही दिलंघेतले तरी त्यांचा संतोष व्हावयाचा नाहीं. कुत्र्याचे शेपूट सरळ करू पाहणे आणि दायादांचे आराधन करणे, ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच अशक्य आहेत. सर्व आप्तवर्गांत दायाद् हे सहजशत्रु गणले जातात, हे बाहेरून बंधुत्व दाखवितील, आणि आंतून केसाने गळा कापितील, यास्तव ह्यांचे साह्य नेहमीं संदिग्ध समजावे. व त्यांचा फाजील विश्वास कधींही धरू नये. व्याही, जावई, मेहुणे, व मामेभाचे ह्यांस वांटा घ्यावयाचा नसतो, यामुळे त्यांचे प्रेम द्रव्यपर नसते, यास्तव त्यांस सहजमित्र झटलें आहे. | सर्व प्रकारच्या मनुष्यबलांत मित्रबल विश्वसनीय खरे, पण ते निर्भेळ सांपडणेच फार कठिण, त्यांत शाळूसोबत्यांची भेसळ झालेली फार असते. जरा चलेतीचा काळ असला कीं पायलीचे पन्नास मित्र जमा होतात, पण तोच काळ फिरला की जाग्यावर एक देखील मिळावयाचा नाहीं. उपकार व प्रेम केले, झणजे सख्य तेव्हांच जोडले जाते, यास्तव मित्र संपादन १ नित्यमन्योन्यसत्दृष्टा व्यसनेष्वाततायिनः । प्रच्छन्न हुदयाघरा ज्ञातयस्तु भयावहाः ॥ ९ रामायण, युद्ध सर्ग. २६. २ धनवन्तं हि मित्राणि भजन्ते चाश्रयन्ति च स्खलितार्य पुनस्तानि संत्यजन्ति च बांधवाः ।। ३९।४० उद्योग, अ० १३६.