३ रें. ] बलाबल विचार. | ९९ होते, हे लढाई आटोपल्यावर पराजित व दीन झालेल्या - मराठ्यांस त्याने चिरकाल स्मरण राही असे अनुपम साह्य केले, त्यावरून ध्यानीं येईलच. पानपतच्या लढाईत जो अनर्थ गुदरला, तो योग्य मसलतीची अवधीरणा केल्यामुळेच गुदरला, दुसरे कांहीं कारण नाहीं. असेच दुसरे ऐतिहासिक उदाहरणे सटले झणजे संभाजीमहाराजांचे होय. शिवाजीमहाराजांच्या कसोटीस उतरलेली मोरोपंत पेशवे, व बाळाजी आवजी चिटणीस, व ह्यां सारखी दुसरी शेकडों तरवारबहाद्दर व कलमबहाद्दर माणसे संभाजी महाराजांच्या पदरीं होतीं, पण त्यांचा काय उपयोग झाला ! त्यांनी ह्या राजकार्यधुरंधर माणसांपैकी कोणास हत्तीच्या पायीं देऊन मारिलें, कोणाचा कुटुंबघात केला, व कोणास नोकरीवरून दूर केले. फार काय सांगावे, त्यांनी आपल्या सापन मातोश्री सोयराबाईसाहेब, ह्यांस भिंतींत चिणून मारिलें, राज्य शत्रूच्या घशांत घातलें, व शेवटी आपण पाणास मुकले. पण उलट पक्षी, त्यांचेच कनिष्ठबंधु राजारामसाहेब पहा. त्यांनी संभाजीमहाराजांच्या तडाख्यांतून जी कार्यकर्ती माणसे बचावली होती त्यांस हाताशी धरून १ मल्हाररामरावकृत संभाजीमहाराजांचे चरित्र पान ४७ पहा.
पान:व्यवहारपद्धति.pdf/112
Appearance