Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ . ] बलाबल विचार. ९१ । व आपणाविषयीं दृढतर प्रेमभाव हे तीन गुण साहचर्याने वसत असले पाहिजेत. या तिहींपैकी कोणत्याही एका गुणाची कमताई असून दुसरे दोन्ही गुण भरपूर असले, तरी त्यांचा कांहीं उपयोग नाही. ज्यांस नीतिशास्त्रान्वये कार्याचा उपक्रम कसा करावा, स्वपरबलाबलाविषयीं तारतम्य कसे पहावे, देशकालविभाग ध्यानीं कसा आणावा, कार्यात अडचणी आल्यास त्या दूर कशा कराव्या, व कार्याचा निर्गम कसा लावावा, ह्या पांच गोष्टींचे ज्ञान चांगले असून जे साम, दान, व भेद या तिन्ही उपायांची योजना करण्यात कुशल, तेच मसलती पुरुष गणले जातात. विचाराकरितां पुढे आलेल्या गोष्टीचे तात्पर्य ध्यानीं आणून विचारपूर्वक सल्ला देणारे, मन न दुखवितां सत्य व स्पष्ट भाषण करणारे, व द्रव्य लोभास्तव विश्वासघात न करणारे मसलतगार मंत्रनिर्णयास योग्य होत. अनुकूल १ अपण्डितो वापि सुहृत्पण्डित वाप्यनात्मवान् । नापरीक्ष्य महीपाल कुर्यात्सचिवमात्मनः ।। १९ उद्योग, अ० ३८. | २उपप्रदानं सांत्वं च भैई काले च विक्रमम् । योग) व रक्षसां श्रेष्ठ तावुभौ च नयानयौ ।। ११ ।। काले धर्मार्थकामान्यः संमन्य सचिवैः सह । नि- ( रामायण पैवेतारमवॉल्लोके न स व्यसनमानुयात् ।। ११ ।। युद्धकाण्ड हितानुबन्धमालोक्य कुर्यात्कार्यमिहात्मनः । राजा | संर्ग ६३ सहार्थतत्वनैः सचिवै वुद्धिजीविभिः ।। १३ ।।