पोहोचल्यावर पोलिसांनी काही हातांचे ठसे घेतले. मी लवकरच ही घटना विसरून गेलो - कारण ते दागिने शेवटी सापडलेच नाहीत. कित्येक वर्षांनंतर, जेव्हा मी आणि माझ्या हाताखाली काम करणारा तो गृहस्थ निरनिराळ्या कंपनीसाठी काम करीत होतो तेव्हा कुणीतरी येऊन मला म्हटलं, “मी पूर्वी तुमच्या हाताखाली काम करणा-या माणसाला भेटलो होतो. तो म्हणाला की तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलंय.” मी म्हणालो, “मी त्याच्यासाठी खूप काही केलंय? मला नाही आठवत.” तो म्हणाला, "त्याच्या घरी घरफोडी होऊन दागिने चोरीला गेले होते तेव्हा." यानंतर माझ्या लक्षात आलं. जरी त्या माणसाला दागिने मिळाले नसले तरीही मी त्याच्यासाठी काहीतरी केलं. तो लग्न करून आला होता. चोरीला गेलेले दागिने त्याच्या बायकोचे होते; त्याचे नव्हते. बायको नवच्याकडे पाहाते : तो पोलिसांना फोन करतो - काहीच घडत नाही. ती मनात म्हणते - काय नवरा आहे हा माझा! आणि नंतर तो नवरा त्याच्या वरिष्ठ अधिका-याला फोन करतो आणि दहा मिनिटांत तो वरिष्ठ अधिकारी पोलिसांना घेऊन येतो. ती म्हणते, “छान! माझा नवरा कुणीतरी आहे!" मी त्याला त्याचे दागिने परत दिले नाहीत; पण त्याची इभ्रत राखली आणि हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे दहा वर्षांनंतरही तो माझी आठवण काढतो. याप्रकारे निष्ठा प्राप्त होते.
जर तुम्ही ही जीवितकार्याची जाणीव, कृतीची जाणीव, निष्ठेची जाणीव मिळवू शकलात तर यश आपोआप मिळतं. उर्दूमध्ये एक शेर आहे.