पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २UB 50 जीं अदृष्टें तीं सर्व एकाच काळीं (ह्मणजे उत्पत्तिकाळीं) 'पूर्ण दशेला येऊन कार्योत्पात्त करू लागतात, असे मानण्याला कांहीच आधार नाही. त्या प्रमाणेच, सर्व जगाचा एकाच काळीं संहार होऊन दोन परार्धवर्षे पर्यंत कोणतीच अदृष्टें पूर्ण दशेला येत नाहीत व त्यामुळे व्या अवधींत प्रळयकाळ राहतो, ही गोष्ट देखील संभवत नाही. या वरून असे सिद्ध होतें कीं, परमाणू मधील मूळ गतीच्या योगाने जग उत्पन्न होणे शक्य नाहीं. परमाणुवादाविरुद्ध दुसरे कांहीं आक्षेप घेऊन शेवटी रामानुजाचार्यांनीं झटले आहे कीं:-कापिल-पक्षस्य श्रुतिन्याय–विरोध-परित्यक्तस्य अपि सत्कार्य-वादादिना क्वचित् । अंशे वैदिकैः परिग्रहः अस्ति । अस्य तु काणाद-पक्षस्य केन अपि अंशेन अपरिग्रहात् अनुपपन्नत्वात् च, अत्यन्त अनपेक्षा एव निःश्रेयसअथिभिः कार्या ॥ (श्रीभाष्य, २।२।१६ ) ह्मणजे, कपिलाने प्रतिपादन केलेला जो सांख्यवाद किंवा प्रधानवाद तो श्रुति व न्याय यांच्या विरुद्ध असल्या मुळे जरी एकंदरीत त्याज्य असला तथापि, प्रत्येक कार्य आपल्या कारणा मध्ये विद्यमान असते इत्यादि सिद्धांत त्या वादा मध्ये समाविष्ट झालेले असल्या मुळे, तो वैदिकांच्या दृष्टीने अंशतः तरी ग्राह्य आहे. परंतु कणादाने प्रतिपादन केलेला जो हा परमाणुवाद तो किंचित् अंशाने देखील ग्राह्य नसल्या मुळे, इतकेच नव्हे तर तो अत्यंत असयुक्तिक असल्या मुळे, ज्यांना परमार्थप्राप्तीची इच्छा असेल, त्यांनी ब्यावादाकडे सर्वथैव दुर्लक्ष केले पाहिजे.