पान:वेरुळ.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६३


[८] कैलास लेणे, नंबर १६.

 वेरूळ येथील सर्व लेण्यांत कैलास हे लेणे अतिशय भव्य व अत्यंत उत्तम आहे, हैं वर लिहिलेंच आहे.

 वेरूळची सर्व लणी पहावयास वेळ नसेल व इच्छा नसेल तर वेरूळच्या लेण्यांच्या सौंदर्याचें सार कैलास पाहून प्राप्त होईल.

 कैलास म्हणजे सुमारें सवाशें दीडशे फूट उंचीचा अखंड पापाणमय पर्वत माध्या- पासून तळापर्यंत खोदून काढलेले एक शंकराचें प्रचंड देवालय आहे. शंभर सावशें फूट लांब, सत्तर ऐशी फूट रुंद, दुमजली आणि शिखरापासून जोत्याच्या तळापर्यंत अत्यंत कुसरीनें खोदलेले असें हें विस्तीर्ण शिव मंदिर पाहून कल्पना करणाऱ्या कारागिराच्या कल्पकतेचें व ठिकाण शोधून काढण्यामध्ये दाखविलेल्या धूर्ततेचें आश्चर्य वाटतें. खोदकाम करणाऱ्या पाथरवटांच्या कारागिरीविषयीं आणि त्यांच्या मेहेनती- विषयीं अत्यंत आदर वाटतो; त्याचप्रमाणे ज्या महात्म्यानें, आपल्या धर्माचा विजय व्हाया, शंकर प्रसन्न व्हावे म्हणून या कामाला जो पाण्यासारखा पैसा खर्च केला असेल आणि तो खर्च करून आपले स्वतःचें नांव मागे राहिले नाही तरी हरकत नाही; केवळ शिवार्पणमस्तु एवढ्याच उद्देशानें कोठेंही आपलें, आपल्या वैभवाचें नांवसुद्धां खोदून ठेवलें नाहीं, त्यांच्या औदार्याविषयीं आणि स्वार्थत्यागाविषय धन्यता वाटते. त्याचप्रमाणे अशा प्रकारची उदार माणसें, असले कारागीर, असले कल्पक शिल्पी आपल्या मायभूमीमध्ये होऊन गेले, याबद्दल तिचा कुसवा नररत्ने उप्तन्न करणारा त्रिवार धन्य आहे, असे वाटतें.

 कैलासाच्या मध्यवर्ती देवळाच्या चारी बाजूंस वीस वीस, पंचवीस पंचवीस फूट जागा प्रांगणासारखी सोडली आहे. मुख्य देवालय पश्चिमाभिमुख आहे. उत्तर, पूर्व आणि दक्षिण अंगांस दगडांत कोरून सोपे काढले आहेत. यांस दर आठ फुटांस चौकोनी खांब आहेत. सोप्यांचे मागील अंगास प्रत्येक खणांत निरनिराळ्या देवतेची मूर्ति आहे. याप्रमाणें सभोवार शेंकडो सुंदर मूर्ति कोरल्या आहेत. प्रत्येक मूर्ति सात आठ फूट रुंद व नऊ दहा फूट उंच अशी भव्य अखंड पाषाणांत कोरून काढली आहे.

 यांपैकी कित्येक वीरभद्रादि शंकराचे अवतार आहेत, तर कित्येक वराह, नृसिंहादि विष्णूचे अवतारही आहेत. कित्येकांत रामायण, महाभारत आणि पुराणे