पान:वेरुळ.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५५


 हीं सर्व चित्रे मूळची अखंड पाषाणांत कोरलेली आहेत. नंतर यावर उत्तम संदल्याची चट देऊन टाकलेली आहे. नकशी वगैरे काढण्यासाठी ही संदल्याची चट दिली असावी अशी कल्पना केली तर, ज्या ठिकाणी आज संदला उडाला आहे, त्याच्या आंत दगडावर इतर ठिकाणच्या संदल्या च्या नकशीपेक्षांही प्रत्यक्षदगडांत जास्त बारीक काम केले आहे. यावरून प्रथम चित्रे कोरणारांनी हा संदला केलेला नसून चित्रे छिन्न विछिन्न झाल्यावर ती पूर्वीप्रमाणे बरी दिसावीत म्हणून एखाद्या श्रीमान गृहस्थानें अगर कोणी राजाने हा संदला केला असावा असे अनुमान काढण्यात जागा आहे. आम्हांला वेरूळ येथे कोणी सांगितले की, प्रख्यात देवी अहिल्याबाई होळकरीण यांनी श्री घृष्णेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार केला त्या वेळी वेरूळ येथील कित्येक शैव लेण्यांवर संदला व रंग चढविला.

 देवी अहिल्याबाई अतिशय धर्मशील होती. तिचें औदार्य अप्रतिम होते. दौलतीचा पैसा तिनें प्रजासंरक्षणार्थ खर्च केला. इतकेच नव्हे तर प्रसंगविशेषी खाज- गीचा पैसाही दौलतीच्या कामी ती उपयोगांत आणी. अशा रीतीनें दौलत व खाजगी यांतील पैसा सरकारी कामांत खर्च करून जी शिल्लक उरली तिचा तिनें एकंदर हिंदुस्थानांत लोकोपयोगी सार्वजनिक कामे करून ठेवण्यांत व्यय केला. तिनें लोकांच्या सोर्यासाठी अनेक अन्नछत्रे, धर्मशाळा व विहिरी, रस्ते, घाट बांधले आहेत. तसेच तिनें अनेक देवालये बांधली असून अनेकांचा जीर्णोद्धार केला आहे. अशाच देवालयां- पैकी श्री घृष्णेश्वराचें देवालय होय.

 आपल्या लोकांत एखादें चांगले कृत्य केले असले तरी ते अमक्यानें, अमक्या हेतूनें, अमक्या शकांत केलें वगैरे नमूद करून ठेवण्याची अनेक प्रसंगी चाल नाहीं; ही गोष्ट मोटीशी चांगली नाही. यापासून पुढील पिढीला अमुक कृत्य कोणी, केव्हां केले वगैरे कांहींएक समजून येत नाहीं.

 गजेंद्रमोक्षामध्ये विष्णूच्या हाती गदा नसून तरवार आहे, हे लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. अथवा हे हत्यार मराठाशाहीत गदा म्हणजे गुरगुज असे, त्या प्रकारचेंही असूं शकेल. यास धरण्यास तरवारीप्रमाणे कबज किंवा मूठ असून पुढें टोंकाला सहा अगर आठ पातींच्या गदेचा गोंडा असता, तें हैं हत्यारें आहे. बाकी विष्णूच्या हाती शंख, चक्र हीं आयुधें आहेत. गरुड केवळ माणसासारखा कोरला