पान:वेरुळ.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३१

अनेक प्रसंगी फार हाल होतात. निजामशाहीमध्ये बांधलेल्या कित्येक बंगल्यांत पाण्याची सोय ह्मणजे नजिक आड, विहीर नसल्या कारणानें पखालीचें पाणी ज्यांस चालत नाही अशा ब्राह्मणहिंदूंचे फार नडते. त्याचप्रमाणे बहिर्दिशेचीही व्यवस्था आपल्या इकडील चालीची बहुतेक ठिकाणी नाहीच. या कारणानें सवय नसलेल्या माणसाला विशेषतः बायका माणसांना फार अडचण पडते. कित्येक रहदारी बंगल्यांच्या शेरेबुकांत हैं आम्ही लिहूनही ठेवले आहे. पण उपयोग होण्यास बराच कालावधि लागण्यांचा संभव आहे.

 औरंगाबादचा जुना तट, त्यांतील भव्य दरवाजा, त्याचप्रमाणे पाणचक्कीची बाग, त्यांतील हजारी, कारंजे वगैरे प्रेक्षणीय स्थळे आह्मी पाहिली. त्यांचे फोटोग्राफही घेतले. पण ते चांगले आले नाहीत !! असो.

 औरंगाबादेहून आह्मी दुपारी पैठणास जाऊन आलो. पैठण तेथून सुमारे तीस बत्तीस मैल लांब आहे. रस्ता सुमार आहे. पैठण वस्ति अलीकडील काळांत अगदी मोडकळीस आली आहे. पूर्वीची फार नामांकित वस्ति खरी. पण आगगाडीचे जाळे हिंदुस्थानांत झाल्यापासून कसलेही पूर्वीचं महत्वाचें शहर असले आणि त्यापासून आगगाडी जर लांब गेली, तर तें गांव दहा पंधरा वर्षांत मोडकळीला येतें, असाच अनुभव आहे. आगगाडीचे गांवी व्यापार जोराचा सुरू होतो आणि या लांबच्या शहरांत व्यापार करणाऱ्या लोकांस त्या स्टेशनवर गेल्यावांचून गत्यंतर नसते.

 पैठण ही हजारों वर्षांची जुनी वस्ति. पण आतां पडके वाडे आणि घरें यावांचून तेथें कांहीं नाहीं.

 आमची मुलगी एकवीरा ऊर्फ आऊताई पैठणास प्रसिद्ध सत्पुरुष शिवदिनकेसरी यांच्या घराण्यांतील रघुनाथबुवा यांस दिली होती. शिवदिनकेसरीचा मठ आणि वाडे पैठणास आहेत. त्यांची समाधिही त्यांच्या मठांत आहे. आऊताई व रघुनाथबुवा यांच्या पश्चात त्यांची मुलगी बगूताई यांजकडे त्या मठाच्या उत्पन्नाचा वारसा आला. उत्पन्न निजाम हद्दीमध्यें, इंग्रज हद्दीमध्ये आणि बडोदें राज्यांत मिळून सुमारे १२/१५ हजारांचे आहे. बगूताई अज्ञान असल्यामुळे त्यांचे इस्टेटीची व्यवस्था पालन करणार ह्मणून निजाम सरकारच्या देखरेखीखाली आह्मीच पहात होतो. आजही बगूताई गेल्या. तर