पान:वेरुळ.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२

ते प्रेमानें पार्वतीकडे पहात आहेत. पार्वती या दृष्टीनें लज्जावनत होऊन स्मित हास्य करते आहे. नवपरिणत वधूवरांच्या भावना अशा रीतीनें फार मनोरम दाखविल्या आहेत. शंकरांचे अनेक गण इतस्ततः आहेत. पार्वतीची एक दासी चामर वारीत आहे. पण तिची एक सखी तिच्या मुखाकडे पाहून " आतां कशी लाजली ! ” अशा भावनेनें, कौतुकानें व आनंदानें तिजकडे वर तोंड करून पहात आहे असें फार सुंदर भावनेचें दृश्य दाखविलें आहे.
 खालच्या बाजूस नंदिकेश्वर आहेत. त्यांच्याबरोबर अनेकविध शिवगण बाग- त आहेत. एक शेपूट धरून ओढीत आहे, तर एक त्यांच्या पुढील पायांत निजून त्यांच्या मुखाकडे पहात आहे. नंदीच्या पाठीमागील अंगात चतुर्मुख, चतुर्भुज ब्रह्मदेव दिसतात. पुढील अंगासही चतुर्भुज शंख, चक्र, गदा घेऊन विष्णु आहेत. विष्णूचा चवथा हात कमरेवर ठेवला आहे.
 पण या चित्रांत आजही आपल्या विवाहप्रसंगी विवाहवेदीच्या चारी बाजूंस ज्याप्रमाणें वया म्हणजे खाली मोठे भांडे, त्यावर त्यापेक्षां लहान, त्यावर त्यापेक्षां लहान अशी भांडी ठेवून वर कलश ठेवतात, याप्रमाणेच थेट वया ठेवलेल्या दिसतात. यावरून आमच्यांतील विवाहप्रसंगी वया मांडण्याची ही चाल निदान पंवरा सतराशें वर्षांची जुनी आहे, यांत कांहीं शंका नाहीं.
 याही चित्राच्या दोन बाजूंस दोन सुंदर कोरलेले सभ आहेत.  याप्रमाणे हॅ सुंदर लेणं शैव लेण्यांतील शेवटचे आहे. एकंदरीने पहाता बुद्ध लेणी बौद्ध धर्माच्या भरभराटीच्या वेळी कोरली गेली आर्य धमांचा पगडा पुन्हां प्रस्थापित झाल्यावर शेव लेणी कोरण्यांत आली. बुद्ध धर्मापेक्षां आपले वर्चस्व दिसावे म्हणून शैव धर्मायांनी आपली लेणी जास्त सुंदर कोरली आहेत आणि अनेक पौराणिक कथा चित्रित करावयाची सवड असल्या कारणाने ही लेणी फार मनोरम झाली आहेत. बुद्ध लेण्यांमध्ये केवळ बुद्धांच्या मृतच कोरल्या असल्यामुळे निरनिराळ्या भावना दाग्बाण्यास त्यांत वावच नव्हता. पण या शेच लेण्यांमध्ये शृंगार, वीर, आदि नवर- सांच्या भावना कोरून शिल्पी कल्पकांनी आपले कौशल्य सर्वस्व त्यामध्ये ओतले आहे. यांत कांहीं शंका नाही.