पान:वेरुळ.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००

पर्यंत साठ सत्तर फूट टेंकडी फोडून प्रत्येक बाजूला म्हणजे उत्तरेकडे व दक्षिणेकडे असा एक एक चौक केला आहे. या चौकांत उतरण्याला पायन्याही आहेत. यामुळे या दोन्ही दालनांला उत्तम उजेड मिळतो व सर्व लेणें फार सुंदर दिसतें.
 या दोन्ही दालनांमध्यें पूर्व अंगास आणि पश्चिम अंगास अत्यंत भव्य सुमारें १५।२० फूट रुंद व तितकीच उंच अशी चित्रे कोरली आहेत. उत्तरेच्या अंगास पश्चिमेच्या भिंतीकडे शिवतांडवाचें चित्र आहे व पूर्वेकडील भिंतीस लक्ष्मीचें चित्र आहे. ह्या असल्या चित्रांचे फोटोग्राफ आम्ही पूर्वी घेतल्यामुळे यांचे घेतले नाहींत. दक्षिणेच्या दालनामध्यें पूर्वेकडील भिंतीस शिवपार्वतीविवाहावें चित्र आहे. शंकरांनी पार्व- तीचा उजवा हात आपल्या उजव्या हातानें धरला आहे. डावा हात कमरेला शेला गुंडा- ळला आहे त्याच्या गांठीवर ठेवला आहे. शंकराची मूर्ति चतुर्भुज आहे. वरच्या उजव्या हातानें ज्ञानमुद्रा दाखविली आहे. डाव्या वरच्या हातांत पुष्प आहे. पार्वतीचें नेसणें पायघोळ आहे. उत्तरीय नाहीं. यामुळे कमरेवरील भाग उघडाच आहे. अलंकार आहेत. मल्याळी तऱ्हेचा मोठा बुचडा मागील अंगास बांधला आहे. पार्वतीच्या मागील अंगास तिचे मातापिता, मेना आणि हिमालय आहेत. शंकराचे मागील अंगास कोणी शिवगण आहेत. चतुर्मुख, चतुर्भुज ब्रह्मदेव खाली बसून विवाहयाज्ञिक चालवीत आहेत व अक्षता टाकीत आहेत.
 विवाह मंगलसमारंभ पाहण्याकरिता आकाशांत अनेक देव आपआपल्या वाहनां- वर बसून आले आहेत. त्यांत गरुडावर बसलेले गदाधर विष्णु, महिपावर वसलेले दंडधारी यम, मेपावर बसलेले अनि, ऐरावतावर बसलेले इंद्र, मकरावर वसलेले वरुण, हरि- णावर वसलेले चंद्र इत्यादि देव ओळखतां येतात. त्यांची हल्लींची पौराणिक स्वरूपही याच वर्णनाची आहेत. आणखीही देवता आहेत पण त्यांची स्वरूप आमच्या ओळखीचीं दिसत नाहीत.
 या विवाहहश्याच्या दोन्ही बाजूंला दोन स्तंभही सुंदर कोरलेले आहेत.
 याच विवाहचित्राच्या समोर म्हणजे पश्चिमेकडील भिंतीला एवढेच मोठे शिव- पार्वती विवाहाचे वेदीवर (बहुल्यावर) बसलेलें चित्र कोरलेले आहे. हॅ चित्र भावनेच्या (Expression) दृष्टीने अत्यंत सुंदर आहे. शंकरपार्वती एकाच आसनावर बसली आहेत. शंकरांनी उजवा हात आपल्या मांडीवर ठेवला आहे. वरील उजव्या हातांत