१० [ प्र. १-२ वेद चार आहेत:- १ ऋग्वेद; हा शब्द ऋक् म्हणजे ऋचा ह्या शब्दापासून निघाला आहे. २ यजुर्वेद, हा शब्द यज् म्हणजे पूजा, यज्ञ करणे ह्या धातूपासून निघाला आहे. वेदांच्या काळाचा इतिहास. ३ सामवेद; हा शब्द सामन् म्हणजे गायन या शब्दापासून निघाला आहे. ४ अथर्ववेद; हा मंत्रतंत्रासंबंधीं वेद आहे. प्रत्येक वेदाचे चार भाग आहेत:- १ संहिता; यांत सूक्ते व प्रार्थना यांचा समावेश होतो. २ ब्राह्मणें ; यांत ब्राह्मणांच्या सोईकरितां प्रत्येक वैदिक संस्काराचे रूपरेखन केलेलें आहे. ३ उपनिषदें; यांत तत्त्वज्ञान भरलेले आहे. ४ आरण्यकें; यांचा संबंध विशेषेकरून पूर्वोक्त उपनिषदाशीं आहे. त्यांचा उपयोग अरण्यवासी द्विज ( ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ) करीत असत. ऋग्वेदाचें एक आरण्यक आहे. त्यास ऐतरेय अशी संज्ञा आहे. त्यांत ब्राह्मण व उपनिषद अशा दोन भागांचा समावेश होतो. ह्या ग्रंथाचे दोन भाग आहेत: १ श्रुति व २ स्मृति श्रुतीमध्ये पुढील शास्त्रे मोडतात:- १संहिता, २ ब्राह्मणें, ३ उपनिषदें, व ४ आरण्यकें. बाकीचीं शास्त्रे स्मृतीत मोडतात. श्रुती म्हणजे प्रत्यक्ष ऐकलेलीं शास्त्रे व स्मृती म्हणजे आठवलेलीं शास्त्रे. हिंदु तत्वज्ञानाचे अथवा दर्शनांचे मुख्य तीन विभाग आहेत व त्यांचे उपभाग-न्याय, वैशेषिक, सांख्य, व योग व पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा - या सर्वोस वेदांचें प्रामाण्य मान्य आहे, पण त्या प्रत्ये- कांत त्यांचा अर्थ निरनिराळ्या तऱ्हेनें लाविलेला आहे. वैदिक व बौद्ध यांमध्ये मत- भेद जो पडला तो पडण्यास काय कारण झालें ? वैदिक लोक म्हणत की पूर्वोक्त ब्राह्मणें हीं श्रुतींत मोडतात व बौद्ध म्हणत कीं तीं मोडत नाहीत. न्याय व सांख्य हीं गौतमबुद्धाच्या पूर्वीच दिसतात. पण वेदान्तमात्र बौद्धमताच्या उलट उत्पन्न झाला असावा, कारण वेदान्त सेश्वरवादी आहे, पण बौद्धधर्म निरीश्वरवादी आहे. वेदान्त अद्वैतवादी आहे, पण बौद्धदर्शन शून्यवादी आहे व सर्व हिंदू तत्वज्ञानाच्या मुळाशीं जें सांख्यदर्शन आहे तें अज्ञेयवादी आहे. व सूत्रे व परिशिष्टे यांचा वेदाशी निकट संबंध आहे. सूत्र याचा अर्थ दोरा असा आहे. त्याप्रमाणे सूत्रे हीं लहान वाक्यांच्या दोग्यांची छोटेखानी पुस्तकें आहेत. ती विद्यार्थ्यास शिकविण्याकरितां तयार केलेली आहेत. परिशिष्टें हीं त्या सूत्रांच्या पुढे तयार झालेली आहेत. ती सूत्रांच्या पुरवण्या होत असें त्यांच्या प्रत्यक्ष नावां- वरून दिसतें. ती लहान मुलांस शिकविण्यास तयार केलेली नाहीत तर तीं अजाण जनांच्या समुदायास धर्माचें सामान्य ज्ञान करून देण्यास रचलेली दिसतात. त्या पासून वैदिक सारस्वताचें पौराणिक सारस्वतामध्ये परिवर्तन कसे झालें ? हे नजरेस पडतें.
पान:वेदांच्या काळाचा इतिहास-पूर्वाध.pdf/३६
Appearance