________________
७४ वेदकालनिर्णय. संबंधाने वेदांत कांहीं उल्लेख नाहीत. परंतु वेदकाळी जर वसंतसंपांत मृगशीर्षात होता तर तो कृतिकांत असल्याचे दाखले वेदांमध्ये मिळणार कसे ? परंतु या गोष्टींकडे लक्ष न देतां आजपर्यन्त विद्वान् लोकांनी भलत्याच गोष्टीवर काथ्याकूट केली आहे. परंतु जर त्यांनी वैदिक सूक्तांचें योग्य तन्हेनें परीक्षण केले असते, तर त्यांना ही गोष्ट सहज कळून आली असती. मग 'संवत्सराच्या शेवटी श्वान ऋभूना जागे करीत ' या वैदिक ऋचेचा खरा अर्थ कळण्यास त्यांना अडचण पडली नसती. यमाच्या कुत्र्याचे स्थान व वृत्राच्या वधाची जागा यांच्या ऋग्वेदांतील वर्णनावरून व 'वृक उर्फ श्वानपुंज देवयानाच्या टोकाला असलेला अपार समुद्र उलटून आल्यावर सूर्याच्या पूर्वी उगवू लागतो' या वर्णनावरून त्या काळची संपाताची जागा स्पष्ट दिसून येते. कित्येकांचें असें ह्मणणे आहे की, वैदिक ऋषींना आकाशस्थ गोलांच्या सामान्य गतींविषयीही माहिती होती असे दिसत नाही. परंतु हे मत फार संदिग्ध आहे. हल्लींच्याप्रमाणे निरनिराळी वेधयंत्रे त्यावेळी नव्हती व म्हणून तेव्हांचे वेध आतांच्या इतके सूक्ष्म नव्हते असा जर वरील ह्मणण्याचा अर्थ असेल, तर ते अक्षरशः खर आहे. परंतु वैदिक ऋषींना सूर्य व उषा याखेरीज दुसरे काही माहीत नव्हते; नक्षत्रे, मास, अयनें, वर्ष वगैरे गोष्टी त्यांना अगदी अपरिचित होत्या, असा जर त्याचा अर्थ असेल तर मात्र या ह्मणण्याला ऋग्वेदांत मुळीच आधार नाही. अर्जुनी,