Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. तारागणवाचकच नांव असावे असे अनुमान होत; व त्याच्या स्थानावरून ते नक्षत्र वर्षारंभीचे असावे असे दिसते. यज्ञग्रथांतला पात्रवाचक ग्रहशब्द आकाशांतील ग्रहांचा वाचक झाला. या यज्ञपात्रांची संख्या व चंद्रसूर्यादि आपल्या ग्रहांची संख्या सारखीच आहे, म्हणून मृगशीर्षवाचक हल्लींचा आग्रहायण शब्द आग्रयण या वैदिक शब्दाचेच रूपान्तर असावा, व मृगशीर्षाला पूर्वी यज्ञ कर्मात आग्रयण ह्मणत असावे असा बराच संभव दिसतो. आग्रयणेष्टींचा खरा अर्थ लोपल्यावर आग्रहायण ऊर्फ आग्रयण या शब्दाचा अयनारंभीचे नक्षत्र असा अर्थ जाऊन तो शब्द ज्या महिन्यांत ती इष्टि होते त्या महिन्याचा वाचक झाला, व त्यावरून " मासानां मार्गशीर्षहम् " वगैरे कल्पनांचा पुढे प्रादुर्भाव झाला. आग्रयण शब्दाचा मृगशीर्ष असा अर्थ कसाही नाहींसा झाला असो, तरी आग्रहायणीचा पाणिनीच्या वेळी ओरायन नक्षत्रपुंज असा अर्थ होता हैं खास. व हा अर्थ त्यास परंपरागतच कळला असला पाहिजे. या मृगशीर्ष ऊर्फ आरोयन वरून कशा कशा कथा उत्पन्न झाल्या हे आफ्ण पूर्वी पाहिले आहेच. एकदा ते आपल्या कन्ये. चाच अभिलाष करणान्या प्रजापतीचे शिर झाले. काहींनी त्याला यमलोकाच्या द्वाराशी इंद्राने छेदिलेले नमुचीचे डोके मानिले. ग्रीक लोकांतही ओरायनची अशीच. दोन तीन प्रकारची गोष्ट आहे. काही ह्मणतात, " ओरायनवर इऑस ( उषस्) हिची प्रीति बसल्यामुळे तिने त्याला दूर नेले. परंतु ही गोष्ट देवांस न आव