Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. आहेत हे उघड आहे. ह्मणजे मृगशीर्षाची आकृतिही, ओरायनचा पट्टा, त्याचे मागचे दोन पाय व पुढला डावा पाय मिळून कल्पिली पाहिजे. या आकृतीप्रमाणे अमराने दिलेली इन्वकांची जागाही साधते. या आकृतींत इन्वका ह्मणजे बाण अथवा ओरायनाच्या पट्यांतील तीन तारा होत. या पुंजामध्ये दुसन्याही कित्येक आकृतींची कल्पना केली असेल. सर्व मृग शरीर, व यज्ञोपवीत धारण करणारा प्रजापति या आकृतींची ही कल्पना केलेली आहे. परंतु या सर्व कल्पनांत शीर्षाची कल्पना सर्वात जुनी दिसते. व ती वरूनच वाढत वाढत दुसन्या कल्पना निघाल्या असे वाटते. या विवेचनांत मृगशीर्ष नक्षत्र ओरायन पुंजांतच आहे असे आपण मानले आहे. व जरी याबद्दल कित्येक पंडितांनी शंका घेतली आहे तरी यांत असंभवनीय असें कांहींच नाही. कारण रमणीय अशा रोहिणी मागून लगेच येणारा दुर्वृत्त प्रजापति रुद्राच्या त्रिकांड बाणाने विद्ध होऊन पडलेला, व तो बाण त्याच्या शिरामध्ये अडकून राहिलेला अद्याप दिसतो आहे. या गोष्टीवरून तारकापुंजासंबंधाने तर शंका रहाणे संभवतच नाही. याप्रमाणे मृगशीर्षाची आकृति प्रथमतः कशी कल्पिली होती हैं पाहिल्यावर दुसऱ्या तारा निश्चित करणे कठीण नाही. रोहिणी संबंधाने शंका नाहींच. रुद्र आर्द्रा नक्षत्राची देवता असल्यामुळे त्याचे स्थान अर्थात् आर्द्रा ह्मणजे ओरायनचा उजवा स्कंध हे होय. परंतु ऐतरेय ब्राह्मणामध्ये ज्याला हल्ली आपण