Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૪૨ वेदकालनिर्णय. पहिल्या प्रतीचे तारे आहेत, दुसन्या प्रतीचे बरेच आहेत, व बाजूला आकाश गंगा आहे. या आकाशप्रदेशामध्ये प्राचीन कवींच्या प्रतिभेला भराया मारण्यास चांगलाच अवकाश मिळाला. या नक्षत्रपुंजावरून किती तरी गोष्टी प्राचीन आर्यामध्ये उत्पन्न झाल्या. त्यांपैकी काहींचे परीक्षण करून त्यावरून आपल्या उपप.. त्तीला काही आधार मिळतो की नाही हे आतां पहावयाचे आहे. आपल्या उपपत्तीप्रमाणे जर त्यांचा आजपर्यंतच्या अर्थाहून अधिक नीट अर्थ लागला, तर आपल्या उपपत्तीला खरी मानावयास एक सबळ कारण मिळेल. परंतु हे परीक्षण करण्यापूर्वी प्राचीन ग्रंथांत वर्णिल्याप्रमाणे विवक्षित तारा व त्यांचे कल्पिलेले आकार हे निश्चित करण्याचा थोडा प्रयत्न करूं. मृगशीर्ष याच्या अर्थावरून त्या पुजाच्या आकाराची कल्पना सहज होईल. परंतु त्यांत अनेक तारा असल्यामुळे हा आकार कल्पिण्यास त्यांपैकी कोणत्या घ्यावयाच्या हे सांगणे जरा कठीण आहे. शीर्ष शब्दावरून सबंध मृग आकाशांत होता असे दिसत नाही. रुद्राने प्रजापतीस बाणाने विद्धिलें या शतपथ ब्राह्मणांतील गोष्टीसंबंधाने सायणाचार्य आपल्या भाष्यांत ह्मणतात "रुद्राने प्रजापतीचे शिर बाणाने छेदिले व तो बाण व शिर ही दोन्हीं Sश, ब्रा. २-१-२-८. 178 इषुणा तस्य शिरश्चिच्छेद........हषुः शिरश्चेत्युमयमंतरिक्षमुत्प्लुत्य नक्षत्रात्मनावस्थितं दृश्यते ।