________________
वेदकालनिर्णय. कोणते उल्लेख आहेत त्यांचा विचार करूं. व प्रथम, तो कृत्तिका नक्षत्रांत होता असे सांगणाऱ्या वाक्यांचा विचार करूं. ___ वराहमिहिराच्या वेळी वसंतसंपात रेवतीच्या चतुर्थ चरणीं होता है सुप्रसिद्धच आहे. परंतु त्याने आपल्या ग्रंथामध्ये दोन ठिकाणी अयनान्ताच्या त्याच्या पूर्वीच्या ग्रंथांत वर्णिलेल्या स्थितिविषयी स्पष्टपणे सांगितलें *आहे. तो म्हणतो 'सांप्रत अयन पुनर्वसूंपासून होते; परंतु, पूर्वी आश्लेषां पासून होत असे.' या वराहमिहिराच्या म्हणण्यास, गर्गपराशरांच्याही वचनांचा आधार आहे. तसेंच महाभारतामध्ये भीष्माचार्य शरपंजरी पडले असतां उदगयनास आरंभ होईपर्यन्त मरावयाचे थांबले; व हा आरंभ माघशुक्लपक्षांत झाला असे वर्णन आहे. यावरून धनिष्ठारंभी उद्गयन होऊन अर्थात् कृत्तिकांमध्ये वसंत संपात होत असे, हे उघड होतें. वेदांगज्योतिघांतही हीच स्थिति दिली आहे. त्यांत उत्तरायण धनिष्ठारंभी, वसंत संपात भरणीच्या पुढे १० अंश दक्षिणायन आश्लेषार्थी, व शरत्संपात विशाखांजवळ, अशा अयन व संपात यांच्या जागा दिल्या आहेत. त्यांवरून ज्योतिषी लोकांनी अयनचलनाची मध्यमगति वर्षास ५० विकला
- बृहत्संहिता ३-१ व २
आकृति पहा. + वेदांग ज्योतिष ५.