Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. वं पुढच्या सहा महिन्यांना पितृयान अथवा दक्षिणायन असें ह्मणत. वर एके ठिकाणी सांगितलंच आहे की, वैदिक कालानंतरच्या ज्योतिषग्रंथांत वर्षारंभ मकरसंक्रमणीही दिलेला आहे, परंतु हा फेरबदल कधी झाला असावा, हे काही निश्चित सांगता येत नाही. परंतु हा फरक झाल्यावर उत्तरायणाचाही अर्थ फिरला. यासाठी प्राचीन वैदिक गोष्टींचा अर्थ लावतांना उत्तरायणाचा ऊर्फ देवलोक किंवा देवयान याचा अर्थ नीट ध्यानात ठेविला पाहिजे. कारण प्रसिद्ध ज्योतिषि सिद्धांतशिरोमणिकार भास्कराचार्य यानाही, उत्तरायण मणजे देवांचा दिवस कसा अशी भ्रांति पडली होती. कारण त्यांच्या वेळी उत्तरायणाचा प्रचलित अर्थ मकरपासून कर्क संक्रमणाचा काळ असा होता. परंतु देवांचा दिवस ह्मणजे उत्तर गोलार्धात सूर्य असतो तो वेळ. तेव्हां उत्तरायण ह्मणजे देवांचा दिवस हे जमावे कसे ? या शंकेचे भास्कराचार्यांना समाधान करतां आले नाही. व “दिनोन्मुखेड तत्फलकीर्तनाय दिनमेव तन्मतम् ।" असें । म्हणून त्यांनी कशी तरी वेळ मारून नेली आहे. परंतु त्यांमां जर उत्तरायण म्हणजे वसंतसंपातापासून शरत्संपातापर्यंतचा काळ असें पूर्वी मानीत असत, हे माहीत असते तर त्यांच्या हातून अशी चूक झाली नसती; असो. याप्रमाणे प्राचीन वैदिककाळी वसंत संपाती वर्षारंभ होत असे, परंतु काळानें तो मकर संक्रमणी येऊन ठेपला. हा फरक झाल्या: बरोबर उत्तरायणाचाही जुना अर्थ- बदलून वर्षाच्या आयनिक + गोलाध्याय ७-११ व १२