Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. असला पाहिजे. वेदांग ज्योतिषामध्ये संवत्सराला उत्तरायणापासून आरंभ केलेला आहे. व श्रौत सूत्रांमध्येही गवामयनादि वार्षिक सत्रांचा आरंभ तेव्हांपासूनच करावा असे सांगितले आहे. देवसंबंधी सर्व कर्मे उत्तरायणामध्येच केली पाहिजेत, असें जैमिन्यादिकांचें मत आहे. व कित्येक ज्योतिष ग्रंथांत दिल्याप्रमाणे उत्तरायण ह्मणजे मकर संक्रमणापासून कर्क संक्रमणापर्यंतचा काल होय. यावरून मकरसंक्रमण हा संवत्सराचा तसाच उत्तरायणाचाही जुन्या वैदिककाळी आरंभ असावा असें प्रथमदर्शनी कोणास वाटेल, परंतु जरा सूक्ष्मपणे वार्षिक सत्रांतील प्रयोगांचे निरीक्षण केल्यास मकरसंक्रमण हा या सत्रांचा आरंभ नसला पाहिजे असे आढळून येईल. कारण पूर्वी सांगितलेच आहे की, विषुवदिनाच्या योगाने जसे वर्षाचे तसे विधूवान् दिवसाच्या योगानें वार्षिक सत्राचे दोन समान भाग होतात. सत्र हे वर्षाचे प्रतिबिंबच होते. व ह्मणून प्रथमतः तरी त्याचे वर्षाशी सर्वांशी साम्य असले पाहिजे.. परंतु वरील कल्पनेप्रमाणे वर्षारंभ मकरसंक्रमणी धरल्यास, विधूवान् दिवस खरोखर विषुव दिवशी म्हणजे संपात दिवशीं न येतां कर्क संक्रमणी येईल. व त्याचा अर्थ जो समान अहोरात्राचा दिवस तो निरर्थक होईल; परंतु असें ह्मणणे नीट नाही. कारण केव्हां तरी त्या शब्दाची योजना सार्थ होत असलीच पाहिजे. व हे ह्मणणे + वेदांगज्योतिष ५ व आश्वलायनश्रौतसूत्र १२-१४-१; २-२-१४-३ व २२. ऐतरेय ब्राह्मण ४-२२ तैत्तिरीय ब्राह्मण १-२-३-१ तांड्य ब्राह्मण ४-७-१.