Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. अधिक मास धरण्याची पद्धति मागाहूनची असावी असे कित्येकांचे मत आहे. परंतु तें निरर्थक आहे. कारण ऋतुमानावरून वर्षाचा अंदाज करणे हे फारसें कठीण नाही. व खरोखर ऋतूंच्या चक्रावरून वर्षाची कल्पना प्राचीन काळी बसविली होती. व असें जर आहे तर बारा चांद्र महिन्याचा काळ ऋतु चक्राच्या पेक्षां वारा दिवसांनी कमी असतो ही साधी गोष्ट मात्र त्या लोकांना समजण्यास कठीण होती असें ह्मणणे जरा धाडसाचंच आहे. या बारा दिवसांचेही उल्लेख पुष्कळ ठिकाणी आले आहेत. व ते सौर वर्षांशी चांद्र वर्षाचा मेळ बसविण्यासाठीच धरीत होते, हे त्यांवरून उघड दिसते. परंतु हे सौर* वर्ष नाक्षत्र होते, की सांपातिक होते हेही पाहिले पाहिजे. सौर वर्षाची कल्पना ऋतुचक्रावरून करीत हैं खरे, तरी संपातचलनामुळे ऋतूंमध्ये होणारा फेर इतका सूक्ष्म आहे की, तो दृष्टोत्पत्तीस यावयास शेकडो वर्षे पाहिजेत. ह्मणून इतका सूक्ष्म फरक प्राचीन आर्यांच्या नजरेस आला असेलसे दिसत नाही. कारण त्यांची सूर्याची क्रान्तिवृत्तांतील जागा

  • वर्षाचे बरेच प्रकार आहेत. एकाद्या नक्षत्रांत आल्यापासून पुन्हां त्याच नक्षत्रांत यावयास सूर्यास जो काळ लागतो, त्यास नाक्षत्र सौर वर्ष म्हणतात. व एका संपातांत आल्यापासून पुन्हा त्याच संपातांत येईपर्यंत त्याला जो वेळ लागतो त्यास सांपातिक किंवा आयनिक सौर वर्ष म्हणावें. संपात चल असल्यामळे दर वर्षास ते थोडे मागे येतात. या कारणास्तव नाक्षत्र सौर वर्षीपेक्षां सांपातिक सौर वर्ष थोडे ( सुमार एक घटिका ) कमी असते.