पान:विवेकानंद.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


 एखाद्या वस्तूच्या ठिकाणी अत्यंत प्रेम जडणे हे सुद्धां एक प्रकारचे सामर्थ्य आहे. ही एक प्रकारची शक्तीच आहे. केवळ एखाद्याच विषयाकडे आपलें सारें लक्ष्य गुंतून राहते; इतकें की आपल्याला त्यावांचून अन्य कशाचेही भान राहत नाहीं; आपला समूळ नाश होण्याची वेळ आली तरी त्या विषयाचा त्याग करावा असे आपल्या मनांत येत नाहीं; या गोष्टी सामर्थ्यावांचून शक्य होतील काय ? यालाही सामर्थ्य लागते. स्वतःला विसरून दुस-याच्या संतोषासाठी वाटेल ते हाल सोसावयाचे हा दैवी गुण आहे. यासाठी अत्यंत आसक्तींत दिसून येणारे मनाचे सामर्थ्य तर आम्हांला हवेच; पण आम्हांला नुसता दैवी गुण पैदा करून स्वस्थ बसावयाचें नाहीं; ह्मणून त्या सामर्थ्याशिवाय आणखी अनासक्तीचे सामर्थ्यही आम्हांस पाहिजे. आसक्तींत दिसून येणारे आणि अनासक्ति मिळविण्यास लागणारे अशी दोन्हीं सामथ्र्ये आम्हांस पाहिजेत. मनुष्याचे पूर्णत्व यांतच आहे. एकाच प्रेमाच्या विषयावर आपल्या आत्मिक शक्तीचे सर्व भांडार रिकामें करीत असतांही, पूर्णत्व पावलेला मनुष्य त्या विषयाबद्दल अत्यंत उदासीन असतो. आतां हैं दुहेरी कार्य कसे साधते हे पाहिले पाहिजे. याचे रहस्य जाणले पाहिजे.
 भिकारी मनुष्य कधीही सुखी असत नाहीं. त्याच्या जीवधारणापुरतें साधन त्याला इकडूनतिकडून मिळते; पण प्रत्येक वेळी त्याचा जिकडेतिकडे तिरस्कारही होतो. त्याला कितीही मोठी प्राप्ति झाली, तरी तिच्या पाठीमागें तुच्छतादर्शक दया आणि तिरस्कार हीं असावयाचीच. भिकारी ह्मणजे कवडीच्या किंमतीचा सुद्धा नाहीं; असे दात्याला वाटल्यावांचून राहत नाही. यामुळे त्याला मिळालेल्या साधनांपासून सुखप्राप्तीही होत नाहीं.
 आपणही बहुतांशी असल्या प्रकारच्या भिका-यांसारखेच आहों. आपण जें जें कांहीं करत त्याचे प्रतिफल मिळावे अशी आपली अपेक्षा असते. आपण शुद्ध वैश्यवृत्तीचे लोक आहों. आपला तराजू सदोदित समतोल राखण्याची आपण फार काळजी बाळगीत असतो. सारा जन्मभर तराजू समतोल कशी राहील याची आपणांस फार काळजी ! हे आपले वाणिज्य कांहीं विशिष्ट गोष्टींसंबंधीच असते असेही नाहीं. आयुष्यातील सर्व प्रकारच्या खटपटींत तीच वृत्ति. मी अमुक केले त्याबद्दल मला अमुक पाहिजे हेंच सदोदित चिंतन. मोठा दानधर्म केला तर त्या पुण्यकृत्याबद्दल नांवाची टिमकी वाजली