पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०

विणक-याचा मार्गदर्शक

एखांद्या बाबतीत सुद्धां हयगय केल्यास पुढे सुताची गुंतागुत होते व ती सोडवीत बसण्यापेक्षा हा धंदा सोडून दिलेलाच बरा असे वाटू लागते. असा प्रसंग नवशिक्यांवर न यावा म्हणून आम्ही इशारत देतो की, पहिल्यापासून प्रत्येक काम काळजीने व समं- जसपणाने केले पाहिजे कारण विणकामांतील पुढच्या सर्व क्रिया या ताण्याच्या व्यवस्थितपणावर अवलंबून असतात.
 पहिली सांद दोऱ्यांच्या समुदायांस गांठ मारलेली असते त्या गांठीजवळ घ्यावी, व नंतर पूर्वी सांगितल्याप्रमाणे वीस वीस यार्डांवर एक सांद घेतली म्हणजे झाले.
 ड्रमचा परीघ सुमारे तीन यार्ड असतो. त्या अदमासाने ड्रम फिरवून आपल्यास पाहिजे असेल तितक्या लांबीचे सूत ड्रम वर घेतल्यावर शेवटी पुन्हां एक सांद घ्यावी, सांदीचे बाहेरील दोरे कापून टाकावे व एक गांठ मारून ती ड्रमवर गुंडाळलेल्या ताण्यांत गुंतवून ठेवावी. कापून टाकलेली हेकफ्रेम मधील सुतांची टोंके पुन्हां एकत्र करून गांठ मारावी व ती पहिल्या गांठीप्रमाणे ड्रमवरील दुसऱ्या पिनम्ध्ये अडकवून दोरे ड्रमवर गुंडाळून घ्यावे. ताणा फार लांब करणे असेल तर रहाटावर ज्या आडव्या पट्या असतात त्यांस उभ्या बारीक खुंट्या मारून दोन खुंट्यांच्या मध्ये ताणा गुंडाळतात असे केल्याने ताण्याची सुतें रहाटावर पसरत नाहीत. ताणा तयार करतांना आणखी अशी एक काळजी घेतली पाहिजे की ताण्याची सर्व सुतें सारखी ताणली जावी. अशा रीतीने कापडाच्या

रुंदीमध्ये जितके उभे धागे घालणे असेल तितके दोरे डमवर घ्यावे.