पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६

विणक-याचा मार्गदर्शक.


 अशा रीतीनें ताण्याचें व बाण्याचें सूत निरनिराळ्या असारींवर घेतल्यानंतर बाण्याचें सूत बॉबिन्सवर व ताण्याचें सूत रिळांवर व्यावें. हें करण्यास एक यंत्र केलेलें आहे त्यास वाईंडर असें म्हणतात.

वाइंडर.


 ज्याच्या परिघाच्या पृष्ठभागावर एक दोरी राहील एवढी खेोंबळ असते असें एक १॥ पासून २ फूट व्यासाचें चाक घेऊन तें आपल्य। आसाभोंवतीं फिरेल अशा रीतीनें एक स्ट्ड्वर उभे केलेलें असतें. याचप्रमाणें त्या चाकाचे समेर एक लहान चाती बसविलेली असते. या चातीचा आंस लांब काढलेला असतो, व त्याचे तोंडांत सूत भरण्याची बॉबिन किंवा रीळ बसवितात. मोठ्या चाकावरून लहान चातीवर एक दोरी पट्टयाप्रमाणें टाकेिलेली असते. यामुळे मोठं चाक फिरविलें म्हणजे लहान चाती अतिशय वेगानें फिरू लागते, व तिचा आंसही फिरतो. या आंसावर बॉबिन किंवा रीळ बसवून त्यावर सूत गुंडाळतात.
 हें यंत्र सर्व कोष्टी लेोकांना माहित आहे, व सामान्य माहितीच्या लेोकांनीहीं तें पाहिलें असेल म्हणून त्याचें वर्णन विशेष बारकाईनें न देतां आकृति मात्र दिली आहे.

 या वाईडरचे सहाय्यानें ताण्याचें सूत रिळांवर व बाण्याचें सूत बॉबिन्सवर घेतल्यानंतर बॉबिन्स एकीकडे काढून ठेवाव्या. आतां ताणा तयार करण्याकरितां रिळांवरील धागे एका शेजारीं एक असे मांडिले पाहिजेत. हें काम जुन्या पद्धतानें केलें असतां प्रयासाचें आहे म्हणून तें सोपें करण्याकरितां एक यंत्र आहे त्यास वार्पिंग मशीनअसें म्हणतात.