पान:वाचन.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचावें कसें.

३९


 याशिवायही आणखी कांहीं खुणा कोणास करणें असतील तर कराव्यात. परंतु पहिल्यानें खुणा बरोबर ठरवून नंतर त्या करीत जाव्यात. नाहीं तर आपण कशाकरितां खूण केली तें पुढे आपणासच समजणार नाहीं ! वर लिहिलेल्या खुणा करण्याचा लेखकाचा क्रम असून तो त्याला फार समाधानकारक वाटतो. त्या योगानें पुस्तकाचा बहुतेक महत्वाचा भाग कोणत्याना कोणत्या तरी खुणांनीं व्याप्त असतो. अशा रीतीनें पुस्तक वाचून झाल्यावर त्यांतील खुणा केलेल्या ओळी पुनः लक्ष लावून वाचाव्यात. वेळीच जेवढे आपल्या ध्यानांत राहील तेवढे चांगलें. नंतर आपल्या वहीत पुस्तकाचें नांव, ग्रंथकर्त्याचें नांव व तें कधीं आणले असेल ती तारीख, इतकें प्रथम टिपून ठेवून नंतर पुस्तकांतील जेवढा मजकूर लिहून ठेवण्यास योग्य असेल तेवढा मजकूर टिपून ठेवावा. कोणत्या पृष्ठावर तो असेल तें पृष्ठ त्या मजकुराच्या बाजूस लिहून ठेवावें व ती स्मरणवही फावल्या वेळीं पाहत जावी, ह्राणजे पुस्तकांतील बराच भाग आपल्या अगदी सहज लक्षांत राहील. नवीन व उत्तम विचारांचा समागम होऊन आपले मन सुसंस्कृत होईल.
 सर्वच पुस्तकें लक्ष लावून वाचण्यासारखी असतात, असें नाहीं. कित्येक साधारण रीतीने वाचून टाकलीं असतां भागतें. कित्येक मधून मधून वाचून पाहण्यासारखीं असतात. पुस्तक म्हटलें कीं, तैं ह्या टोंकापासून त्या टोकापर्यंत वाचून टाकिलेंच पाहिजे असें नाहीं. यासंबंधानें लिहीत असतां लॉर्ड बेक थानें ह्यटलें आहे, “ कित्येक पुस्तकें फक्त चव घेऊन सोडून देण्याच्या लायकीची असतात; कित्येक गिळून ठेवण्यासारखी असतात व कित्येक ( अशांची संख्या थोडी असते ) चावून चावून खाण्यासारखीं व जिरविण्यासारखी असतात. ह्मणजे कित्येक पुस्तकें अशीं असतात कीं, तीं अंशतः वाचावी, कित्येक