Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मागे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या एका कामगारविषयक खटल्याचा उल्लेख झाला आहे. त्या संदर्भातील आपली आठवण सांगताना शंकरराव कुलकर्णी म्हणतात, - “एकदा घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टमध्ये एक मोठा संप झाला व बरेच दिवस टिकला. त्या संदर्भात ड्रायव्हर व क्लीनर यांचे ड्युटी अवर्स, विकली ऑफ प्रॉव्हिडंट फंड या संबंधीचे अत्यंत अडचणीचे प्रश्न उभे राहिले. त्यावर काय उपाय काढता येईल यावर आम्ही रोज चर्चा करत असू. एका संध्याकाळी मी व पत्रावळीसाहेब आमच्या ऑफिससमोरच्या एका झाडाखाली बसून विचार करत होतो. अचानक आमच्या डोक्यात एक कल्पना आली - आपण असा काही अॅग्रीमेंट फॉर्म तयार करू शकू का, की ज्यामुळे ह्या सगळ्या अडचणी दूर होतील? आम्ही तडक वसंतरावांकडे गेलो व आमची कल्पना त्यांना सांगितली. त्यांनाही ती आवडली आणि पुढच्या चार-पाच दिवसांत अत्यंत परिश्रमपूर्वक व सर्व कायदेशीर बाजूंचा विचार करून एक अॅग्रीमेंट फॉर्म वसंतरावांनी तयार केला. त्या वेळी जरूर तेथे त्यांनी इतर वकिलांचाही सल्ला घेतला होता. पुढे ह्या अॅग्रीमेंटमुळे आमच्या सर्व अडचणींवर आम्ही मात करू शकलो. त्यानुसार हिशेबलेखनाच्या पद्धतीतही फार कल्पक बदल करण्यात आले. विशेष म्हणजे हे अॅग्रीमेंट सुप्रीम कोर्टापर्यंत चॅलेंज होऊनसुद्धा वैध ठरले. ही वैयक्तिकरीत्या वसंतरावांनी ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला दिलेली देणगी ठरली. या सर्व सिस्टिमची माहिती घेण्याकरिता भारतातील बऱ्याच कंपन्या आमच्याकडे येत असत. म्हणून ज्या झाडाखाली आम्हांला ही कल्पना सुचली त्या झाडाला आम्ही चेष्टेने 'बोधीवृक्ष' म्हणत असू! “वसंतरावांपेक्षा मी १२ वर्षांनी लहान. व्यावहारिक पातळीवर बघितलं तर अगदीच लहान; त्यांचा एक छोटा कर्मचारी; पण वसंतराव लहानथोर असा भेद सहसा करत नसत. नेहमी सगळ्यांना सन्मानाने वागवायचे. ड्रिंक घेतलं की, ते कधीकधी चिडायचे, पण तेवढ्यापुरतेच. एकदा मुंबईला आम्ही गाडीतून प्रवास करत होतो. साधारणतः पनवेलनंतर एका विषयावरून आमच्यात वाद सुरू झाला. वसंतराव इतके चिडले होते, की दादरजवळ गाडी आल्यानंतर ते ओरडून 'यू गेट आऊट' असं म्हणाले. मीही तत्काळ गाडी थांबवून गाडीतून उतरलो व नेहमी राहत होतो ते लॉज सोडून दुसरीकडे राहायला गेलो; पण दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वसंतराव माझ्या खोलीवर स्वतः आले आणि त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, 'मी रागावलो, गेट आऊट म्हणालो, हे मला मान्य आहे. पण म्हणून तू ताबडतोब उतरून दुसरीकडे राहणं हे वसंतवैभव । १४ ।