त्यांनी मिळवलेले राजाराम रायफलचे कंत्राट किंवा स्पेअर पार्ट्सच्या व्यवसायात त्यांनी केलेले पदार्पण ही आलेली संधी त्यांनी कशी अचूक हेरली आणि त्यातून त्यांनी व्यवसाय कसा उंचावर नेला ह्याची उत्तम उदाहरणे आहेत. हा व्यवसाय उंचावर नेतानाच वसंतरावांनी पहिल्या दहा-पंधरा वर्षांत केलेली आपल्या वेगवेगळ्या व्यवसायांची पायाभरणी इतकी भक्कम आणि पद्धतशीर होती, की पुढील काही वर्षांत ते सर्वच व्यवसाय जोरदार भरारी घेणार हे उघड होते. घाटगे-पाटलांनी महायुद्धानंतरच्या काळात मालवाहतुकीच्या व्यवसायात पदार्पण केले, तेव्हा जवळच्या दोन-चार ट्रक्सच्या साह्याने तशी मालवाहतूक करणारे महाराष्ट्रात अनेक जण होते; पण त्या अनेकांपैकी एक न राहता खऱ्या अर्थाने घाटगे-पाटलांच्या मालवाहतूक व्यवसायाने झेप घेतली, ती त्यांनी पार्सल सर्व्हिस सुरू केली तेव्हापासून. तिथेही आलेली संधी अचूक हेरायचे वसंतरावांचे कसब दिसते. बल्क कार्गो हा मालवाहतुकीतला अधिक प्रचलित प्रकार होता. त्यात संपूर्ण ट्रक एकाच प्रकारच्या किंवा एकाच कंपनीच्या मालासाठी बुक केला जाई. खाणीतील खनिजे, सिमेंट, साखरेची पोती, कारखान्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारी साधने वा अन्य उत्पादने वगैरे मालासाठी हा पर्याय योग्यच होता. तसा बल्क कार्गो हाताळणारे अनेक जण होते; पण पार्सल सर्व्हिस देणारे महाराष्ट्रात तरी त्या वेळी कोणी नव्हते. पार्सल सर्व्हिसमध्ये अनेक ग्राहक आपापली छोटी छोटी पार्सल्स एकाच ट्रकमधून एकीकडून दुसरीकडे पाठवू शकत. तशा छोट्या पार्सल्सची वाहतूक ही काळाची गरज होती. फळे-भाजीपाला, रेडिओ- पंखे-इस्त्री यांसारखी घरगुती उपकरणे, फर्निचर, पुस्तके - मासिके, छोटी यंत्रे वा अन्य उत्पादने, कापडाचे गठ्ठे, कारखान्यांना कमी प्रमाणात लागणारा कच्चा माल किंवा बाजारपेठेत कमी उठाव असलेली उत्पादने वगैरे असंख्य प्रकारच्या गोष्टी इकडून तिकडे पाठवण्याची त्या काळी फारशी सोय नव्हती व म्हणूनच त्याचे मार्केट खूप मोठे होते. बल्क कार्गो व आजची कुरिअर सर्व्हिस यांच्यामधला असा हा मार्केटचा मोठा भाग होता. पार्सल सर्व्हिस देणे तसे सोपे नव्हते. बल्क सर्व्हिसमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संपूर्ण ट्रकलोड पोचवला जाई. पार्सल सर्व्हिसमध्ये एकाच ट्रकमध्ये वेगवेगळ्या गावांची पार्सल्स भरलेली वसंतवैभव | ७२ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/७४
Appearance