अनुक्रमणिका माझे वडील वसंतकाका! प्रकाशक मोहन घाटगे यांचे मनोगत व्यवसायाचा आणि रसिकतेचा समृद्ध वारसा विक्रम किर्लोस्कर यांचे मनोगत प्रास्ताविक ०७ १३ १५ १. जडणघडण २१ कोल्हापूरची पार्श्वभूमी... हसूरचंपू... ९ मे १९१६ रोजी जन्म... बालपण अन्य चार भावंडे... भोवतालचा कर्मठ समाज... वडील माधवराव व आई राधाबाई यांचे संस्कार... कोल्हापूरला स्थलांतर... शालेय व महाविद्यालयीन जीवन... फर्ग्युसन कॉलेज, पुणे... १९३८, बॉटनी विषय घेऊन एमएस्सी उत्तीर्ण... औपचारिक शिक्षणपर्व समाप्त. २. सुरुवात गृहस्थाश्रमाची ३३ प्रमिला गलगली यांच्याशी परिचय... मैत्री... २६ मे १९४० रोजी लग्न... आधी पुण्यात व मग कोल्हापूरला नोकरी... बापूसाहेब पाटील व नंतर जयकुमार पाटील यांच्याबरोबर मैत्री... सखारामपंतांचे बेळगावमधील काम... भागीदारीत वाहतूक व्यवसायाची सुरुवात... राजाराम रायफलला लाकूड पुरवायचे कंत्राट... टीबीची लागण... रोगावर मात.... ४ नोव्हेंबर १९४५ घाटगे अँड पाटील कंपनी स्थापन. ३. गाडी सुरू करताना ४५ देशातील व कोल्हापुरातील तत्कालीन उद्योगक्षेत्राचे स्वरूप... दुसऱ्या महायुद्धातून निर्माण झालेल्या संधीचा अचूक फायदा... स्पेअर पार्ट्स विक्री... खरेदीसाठी मुंबईशी येत गेलेला संबंध... दृष्टीत येत गेलेली व्यापकता... ट्रक विक्री... मोटारी, ट्रॅक्टर्स, शेती अवजारे, स्कूटर्स, सायकलींची एजन्सी... गांधीहत्या व तिचे पडसाद... ट्रक, एका व्यापक सामाजिक परिवर्तनाचा अग्रदूत.
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/६
Appearance