Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यातून मग अशा सुट्या भागांची विक्री आपणच का करू नये, हा विचार घाटगे-पाटलांच्या मनात बळावला. सुट्या भागांचे देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ (मार्केट) मुंबईत गिरगावमधल्या ऑपेरा हाउस इथे होती. तिथे जायचे, वेगवेगळ्या दुकानांमधून चकरा मारायच्या, हवा तो पार्ट शोधायचा, तो आपल्याला हवा तसाच आहे ना ह्याची श करायची, नंतर कमीत कमी दरात तो खरेदी करायचा व कोल्हापुरात परतायचे म्हणजे त्या काळात तीन-चार दिवस सहज जायचे. त्यामुळे कधीही मुंबईला गेले तर स्वतःपुरता एक पार्ट आणण्याऐवजी एकदम तसले १०-१२ पार्ट्स आणायला वसंतरावांनी सुरुवात केली. तसे करणे केव्हाही फायदेशीर होते. स्वतःची गरज तर भागायचीच; पण जवळचे उरलेले पार्ट्सही कोल्हापुरात हा हा म्हणता संपायचे. ह्यांच्याकडे स्पेअर पार्ट्स उपलब्ध असतात ही बातमी अन्य ट्रक व्यावसायिकांत पसरली. हवे ते पार्ट्स कोल्हापुरातच मिळाले तर त्यांना ते हवेच होते, त्यामुळे चांगला नफा घेऊन तो पार्ट विकता यायचा. ऑपेरा हाऊसच्या व्यापाऱ्यांकडून एकाच वेळी जास्त नग खरेदी केल्यामुळे दरही कमी बसायचा हा फायदा वेगळाच. मालवाहतुकीसारख्या निखळ सर्व्हिस इंडस्ट्रीमधून अधिक फायदेशीर अशा ट्रेडिंगकडे जाणारा हा रस्ता होता. ह्या साऱ्या स्पेअर पार्ट्स व्यवहारात आर्थिक फायदा तर भरपूर होताच; पण याचे आणखी दोन मोठे फायदे झाले. एक म्हणजे ह्या निमित्ताने मुंबईतील ऑटो पार्ट्सचा बाजार वसंतरावांना खडान्खडा माहिती झाला. कुठले पार्ट्स कुठे मिळतात, कुठले व्यापारी डायरेक्ट सेलिंग एजंट आहेत, कोणता व्यापारी किती टक्के डिस्काऊंट देतो, पार्ट्स खरेदी करताना कसली काळजी घ्यायची, स्वस्तात स्वस्त पार्ट्स कसे मिळवायचे, मालाच्या पॅकिंगवरून माल खरा आहे की नाही, हे कसे पडताळायचे, आपण माल खरेदी करताना फसवले जायची शक्यता कुठे कुठे असते वगैरे अनेक गोष्टी त्यांना ठाऊक झाल्या. देशभरचे ग्राहक आपापले पार्ट्स घेऊन जायला इथे ऑपेरा हाऊसला येत. बहुतेकदा हे पार्ट्स ते आपापल्या गावी ट्रान्सपोर्टने पाठवत असत. त्यामुळे मुंबईतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांशीदेखील संबंध येत गेला. काही निवडक विक्रेत्यांकडे वरचेवर गेल्यामुळे त्यांच्याशी मैत्री जोडता आली. थोडक्यात म्हणजे मार्केटची उत्तम ओळख झाली; वसंतराव मार्केट-सॅव्ही बनले. S गाडी सुरू करताना । ५५ ।