Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाडी सुरू करताना WAVE ITAL PA STECW प्रकरण ३ १९४५च्या ऐन दिवाळीचे दिवस होते. नेहमीप्रमाणे घाटगे कुटुंबात नातेवाईकांची वर्दळ उसळली होती. बहुतेक मुले शिकायला म्हणून कोल्हापुरात किंवा बंगलोरला होती. तिथे विष्णुपंतांचे बस्तान चांगले बसले होते व बंगलोरला शिक्षणाचीही चांगली सोय होती. माधवराव आणि मत्याक्का बराच काळ हसूरचंपूला घालवत असत आणि 'कमी तिथे आम्ही' ह्या न्यायाने जिथे गरज अधिक असे तिथे जात असत; पण उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत सगळ्यांनी हमखास कोल्हापुरात एकत्र जमायचे हे ठरलेले असे. यंदाची दिवाळीही उत्साहात एकत्र पार पडली. वसंतराव जिवावरच्या दुखण्यातून सुखरूप बाहेर पडले ह्याचा सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला होता; पण घरच्या गोकुळात रमण्यापेक्षा बाहेर व्यवसायात लक्ष केंद्रित करणे आता वसंतरावांना अत्यावश्यक होते. काम मिळवणे त्या काळात सोपे नव्हते. बाजारपेठेत त्यांच्या फारशा ओळखी नव्हत्या. जयकुमार यांचाही आधीचा मालवाहतुकीचा अनुभव गाडी सुरू करताना । ४५ ।