कॉलेजची वेळ संपल्यावर वसंतरावांकडे मित्रांसाठी भरपूर वेळ असायचा. त्यांचे मित्रवर्तुळ होतेही मोठे. त्यातलेच एक होते बापूसाहेब पाटील. दोघे अगदी कॉलेजात शिकत असतानापासूनचे मित्र. १९३५ सालापासूनचे. पुढे बापूसाहेब मुंबईला ग्रँट मेडिकल कॉलेजात शिकायला गेले; पण मेडिकलचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले नाही, ते कोल्हापुरात परतले. पाटील कुटुंबीयांची कोल्हापुरात एक लाकडाची वखार होती. वखारीत दोघे खूपदा गप्पा मारत बसायचे. बापूसाहेबांचे थाकटे भाऊ जयकुमारदेखील ह्या गप्पांत सामील होत. त्यांच्याशी वसंतरावांची अधिकच घट्ट मैत्री जमली. जयकुमारांचा जन्म २२ फेब्रुवारी १९२२चा; म्हणजे वसंतरावांपेक्षा ते सहा वर्षांनी लहान. तसे दोघांचे स्वभाव अगदी भिन्न पाटील परिवार दिगंबरपंथीय जैन होता, कोल्हापूर जिल्ह्यातल्या हालोंडी गावचे हे पाटील. बऱ्यापैकी समृद्ध. गावची शेतीवाडी भरपूर; पण घरात शिक्षणाचे प्रमाण फारसे नव्हते. जयकुमार स्वतः ही फारसे शिकलेले नव्हते. कोल्हापूर-मुंबई ह्या मार्गावर त्यांचा मालवाहतुकीचा व्यवसाय होता. व्यवसाय होता छोटासाच; एकाच ट्रकवर आधारित तोदेखील खूपदा जयकुमार स्वतःच चालवत. या दोघा भागीदारांविषयी पुढे आठव्या प्रकरणात विस्ताराने येणारच आहे. साधारण १९३५-३६च्या सुमारास वसंतरावांचे मोठे भाऊ सखारामपंत ऊर्फ तात्या सिव्हिल इंजिनिअर बनून कोल्हापुरात परतले होते व त्यानंतर लवकरच त्यांनी स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केला होता. त्यापूर्वी छत्रपती बांधत असलेल्या राधानगरी धरणावरही त्यांनी एक-दोन वर्षे नोकरी करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला होता. मॉडर्न बिल्डर्स ही त्यांची फर्म रस्तेबांथणीच्या कामात पुढे खूप नामांकित झाली. चाळीसच्या व पन्नासच्या दशकात त्यांनी बरीच मोठी कामे केली. बेळगावजवळ सामरा येथे १९४१-४२च्या सुमारास हवाई दलाचा एक विमानतळ बांधला जात होता. त्याच्यासाठी काही बांधकाम करायचे कंत्राट सखारामपंतांना मिळाले होते. हे कंत्राट घाटगे अँड पवार या नावाने त्यांनी भागीदारीत सुरू केलेल्या एक कंपनीला मिळाले होते. त्यासाठी त्यांना सारखा कोल्हापूर-बेळगाव प्रवास करावा लागे. कामासाठी लागणारा बराचसा माल ते कोल्हापुरात खरेदी करत व तो बेळगावला साइटवर न्यावा लागे. त्याच्या वाहतुकीसाठी त्यांच्याकडे एक जुना ट्रक होताच; पण त्यांना आणखी एका ट्रकची गरज होती व ती त्यांनी वसंतरावांकडे व्यक्त केली होती. 'जया, तो ट्रक तू का नाही पुरवत? तुलाही निदान वर्षभरतरी नियमित काम मिळेल, रोजच्या रोज सुरुवात गृहस्थाश्रमाची । ३५ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/३७
Appearance