Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २ सुरुवात गृहस्थाश्रमाची कोल्हापुरात राजाराम कॉलेजात शिकवत असलेले ना. सी. फडके हे त्यांच्या 'दौलत' आणि 'जादूगार'सारख्या रोमँटिक कादंबऱ्यांसाठी त्या काळात खूप प्रसिद्ध होते. तत्कालीन तरुणांवर तर त्यांच्या प्रेमात पडलेल्या देखण्या, उमद्या नायक-नायिकांचा प्रचंड प्रभाव होता. असे काहीतरी आपल्याही आयुष्यात घडावे हे वयात आलेल्या प्रत्येकाचेच गुलाबी स्वप्न असायचे. वसंतरावांनी फडके यांच्या कादंबऱ्या किती वाचल्या होत्या हे सांगता येणार नाही; पण तसेच काहीतरी पुण्यातील त्यांच्या वास्तव्यात प्रत्यक्षात घडले, असे त्या कालखंडाच्या साक्षीदारांच्या आठवणींतून जाणवते. सुरुवात गृहस्थाश्रमाची। ३३ ।