Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वारसा वसंतरावांचा प्रकरण ९ वसंतरावांनी व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा आणि पुढे ते व्यवसाय वाढवत गेले तेव्हा, म्हणजे साधारण १९४५ ते १९७० या कालखंडात, मुंबई आणि काही प्रमाणात पुणे सोडले, तर कारखानदारी अशी महाराष्ट्रात फारशी नव्हती. एकूण देशाचा विचार केला, तरी फारच थोड्या गोष्टींचे उत्पादन देशात होत असे. बहुतेक गोष्टी आयातच केल्या किंवा असेम्बल केल्या जात. एकूणच सगळा देश औद्योगिकदृष्ट्या मागासलेला होता. आज सगळीकडे उद्योजकतेची चर्चा होत असते. बँका कर्ज द्यायला तयार असतात, सरकारही अनेक विकासयोजनांमार्फत वारसा वसंतरावांचा | २२५ |