Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राम कर्णिक यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ मागेही आलेला आहे. त्या पुस्तकात कर्णिक यांनी लिहिलेला ड्रिंकबद्दलचा एक उतारा उथे उद्धृत करण्यासारखा आहे. कारण त्यातून वसंतरावांची ड्रिंकबद्दल एकूण काय भूमिका होती ते स्पष्ट होते. कर्णिक लिहितात, "हिंदुस्थान मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एपीआय, टाफे, सम् अँड कंपनी, किलिक निक्सन, ल्युकास, बॉश, एक्साईड वगैरे कंपन्यांनी बोलावलेल्या डीलर्स कॉन्फरन्सेसमध्ये मी भाग घेतला. बऱ्याच मोठ्या एजन्सीजच्या मालकांचा यात समावेश असायचा. एम. ए. चिदंबरम हे दक्षिणेकडचे मोठे उद्योगपती, काश्मीरचे मिनिस्टर त्रिलोचन दत्त, श्री. नंदा, श्री. केशब महिंद्रा, श्री. तलवार, श्री. झुनझुनवाला आदींची माझी चांगली जानपहेचान झाली होती. कॉन्फरन्सनंतर रात्री अनौपचारिक मीटींग्स होत, तेव्हा दारूच्या ग्लासाबरोबर मनमोकळ्या गप्पागोष्टी होत. मी मात्र त्यांच्यात लेमन स्क्वॉश, फ्रेश लाइम ज्यूसचा ग्लास किंवा प्लेन सोडा घेऊन बसे. सगळ्यांना माझ्या 'टी टोटलर' असण्याचं आश्चर्य वाटे. न पिणारा माणूस म्हणून कधी कधी कोणी मला कमी दर्जाचा समजत. श्री. घाटगे यांनी ते ओळखलं आणि ते म्हणाले, 'तुम्ही कॉन्फरन्समध्ये चमक दाखवली, भाषणं केली, पेपर्स वाचले तरी त्यांचा इम्पॅक्ट तेवढ्यापुरताच. मैत्री करायची असेल, आणि त्या मैत्रीतून आपल्या व्यवसायाचा फायदा करून घ्यायचा असेल, तर या मंडळींशी बरोबरी केली पाहिजे. तुमच्याशी कोणी सावधपणे वागायला नको असेल आणि बरोबरीच्या नात्याने मनमोकळं बोलायला हवं असेल, तर तुम्हीही ड्रिंक घ्यायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हांला वैयक्तिकदृष्ट्या दारू म्हणजे अपेयपान वाटत असलं, तरी नोकरीचा एक अविभाज्य भाग म्हणून ड्रिंक्स घ्यायला पाहिजेतच.' आणि त्यांनी स्कॉच व्हिस्कीचा ग्लास माझ्या हातात दिला. हा माझा दारूचा पहिला प्याला. आणि तो 'एकच प्याला' राहिला नाही. पुढे पंधरा वर्षं मी बिअर, व्हिस्की, ब्रँडी, जिन, व्होडका वगैरे पेयं, रोज नाही पण अधूनमधून घेत असे.” (पृष्ठ ७९) उद्योगजगताशी किंवा एकूणच समाजाच्या उच्चभ्रू वर्तुळाशी ज्यांचा निकटचा परिचय आहे त्यांचा ह्या संदर्भातील अनुभव साधारण अशाच स्वरूपाचा असू शकेल. डॉ. अरुण दाते यांच्या आठवणीनुसार मधेमधे दोनदोन महिने वसंतरावांनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून ड्रिंक घेणे बंद केले होते, तेवढे वसंतवैभव | २१८ ।