पुढे मात्र शारीरिक त्रास वाढत गेले. आयुष्यभर बंधुतुल्य असलेल्या जयकुमार यांच्याशी होत गेलेल्या मतभेदांमुळे वाढत गेलेला मानसिक ताण कदाचित शरीरावरही परिणाम करत होता. वसंतराव आणि जयकुमार यांच्यातील शेवटच्या सहा वर्षांतील काही पत्रव्यवहार उपलब्ध आहे व त्यावरून ह्या काळात दोघांमधील मतभेद अधिकाधिक तीव्र होत गेल्याचे जाणवते. आपल्या डोळ्यांसमोरच व्यवसायाचे विभाजन व्हावे व योग्य तो वाटा आपल्या मुलांना मिळावा अशी वसंतरावांची इच्छा त्यातून व्यक्त होते. मोहन आणि सतीश या आपल्या दोन मुलांच्या भवितव्याची काळजीही त्यांना बरीच होती असेही जाणवते. यांतील वसंतरावांनी हाती लिहिलेले शेवटचे पत्र १२ फेब्रुवारी १९८६ या तारखेचे आहे. प्रत्यक्षात मात्र हे विभाजन त्यांच्या हयातीत होऊ शकले नाही व भविष्याबद्दलची एक प्रकारची अनिश्चितता वसंतरावांच्या मनात शेवटपर्यंत कायम राहिली होती असे म्हणता येईल. या उतारवयात वसंतरावांचे एकूण जीवन कसे होते ? १९७९ साली वसंतरावांना अर्धांगवायूचा झटका आला. वाचा बरीचशी गेली आणि ते काय बोलत आहेत हेही समोरच्याला खूपदा समजत नसे. हातावर परिणाम झाला. काही लिहिणे सोडाच; पण सही करणेही अवघड झाले. शरीराची डावी बाजू बरीचशी लुळी पडली. दुसरा कोणी असता तर त्याने हाय खाल्ली असती; पण वसंतरावांनी मात्र जिद्द सोडली नाही. लहान मुलासारखी अक्षरे गिरवायला त्यांनी सुरुवात केली. घोटून घोटून आथी त्यांनी आपली सही व्यवस्थित केली; नंतर ते इतरही जुजबी लिहायला लागले. हाताचे व पायाचे व्यायाम अगदी नियमित करू लागले; ; नुसत्या गप्पा मारायला बसले, तरी हातात तो बोटांनी दाबायचा व्यायामाचा बॉल असायचा. अॅलोपॅथीमध्ये उपलब्ध होते ते सगळे उपचार वसंतरावांनी करून घेतले; पण वर्षभर प्रयत्न करूनही फारसा गुण आला नाही. विशेषतः बोलणे सुधारेना. केरळमधील कोट्टकल येथे असलेल्या एका आयुर्वेदिक उपचार केंद्राबद्दल त्यांना कोणीतरी सांगितले. तिथे वसंतराव गेले. मीना गद्रे म्हणतात, वसंतवैभव | २१६ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२५०
Appearance