Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डॉ. नलिनी देसाई म्हणतात, “माझ्यात आणि सुलभामध्ये ती मला नेहमी झुकतं माप द्यायची, कारण दोघींमध्ये मी कमजोर होते. माई म्हणायची, 'सुलू दणकट आहे. तिचा स्वभावही स्वतःहून पुढाकार घ्यायचा आहे. वसंतकाकांचीही ती लाडकी आहे. त्यामुळे तिला जे हवं ते ती स्वतःच्या बळावर मिळवेलच.' म्हणून तिच्यापेक्षा माझ्या गरजा भागतील याची माई खास काळजी घ्यायची, माझी बाजू घ्यायची. हॉस्टेलमध्ये राहणं मला आवडायचं नाही आणि मेडिकलचा अभ्यासक्रम सोडून द्यायचा माझा विचार होता. त्या वेळी तिनेच मला धीर दिला आणि मेडिकल कंटिन्यू करायला सांगितलं. ज्यांच्याशी मी लग्न ठरवलं ते डॉ. महेश गुजराती आहेत व म्हणून ते स्थळ तिला तितकसं पसंत नव्हतं. तरीही आम्हां दोघांवर तिचा पूर्ण विश्वास होता. आम्ही इंग्लंडमध्ये असताना तिनेच आमच्या मिहिरला सांभाळलं होतं. "आम्ही नवा संसार थाटला, तेव्हा अनेक गोष्टींची आम्हांला गरज होती. ते ओळखून तिने आमच्यासाठी बरचसं फर्निचर पाठवलं होतं. त्याची आम्हांला तेव्हा खूप मदत झाली होती. आमचं कसं चाललं आहे, हे जाणून घ्यायला ती नेहमी उत्सुक असायची. आमच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी तिने आम्हांला एक आशीर्वाद देणारं पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची भाषा अतिशय सुंदर होती. तिच्यात तेवढं भाषाप्रभुत्व असेल, याची मला कल्पना नव्हती. S “आम्ही तसे कोल्हापूरपासून लांब राहायचो; पण दरवर्षी तिच्या वाढदिवशी आम्ही कोल्हापूरला जायचो. एप्रिल महिन्यात असायचा. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत. खूप नातेवाईक जमायचे; पण माईने किंवा माझ्या वहिन्यांनीही इतके सगळे पाहुणे येतात म्हणून कधीच तक्रार केली नाही. ● "तिच्यासाठी खूप काही करायची माझी इच्छा असायची; पण तशी संधीच तिने कधी मिळू दिली नाही. नाही म्हणायला एकदा 'मला चार थाम यात्रा करायची आहे' असं ती म्हणाली व महेशच्या मदतीने मी तिची ती इच्छा पूर्ण करू शकले, याचा मला आनंद होतो. " पुढे आर्थिक सुबत्ता प्राप्त झाल्यावर आम्हांला जे काही हवं, ते सारं द्यायची तिची क्षमता होती; पण त्याही परिस्थितीत माईने आम्हांला नेहमी काळजीपूर्वक खर्च करायला शिकवलं. आम्ही मुलं मोठी होत असताना वसंतकाकांना आमच्यासाठी त्यांच्या व्यवसायामुळे फारसा वेळ नातिचरामि | १९३ ।