स्पोर्टस्मन, शिवाय त्या काळात कॉलेजपर्यंत मजल मारलेली, गुड लुकिंग! अशी मुलगी सोडायची नाही, असं वसंतकाकांनी पक्कं ठरवलं असावं. आणि म्हणूनच पोरगी पटवली! माईच्या मैत्रिणी साठे भगिनींच्याकडून हे किस्से ऐकायला मिळाले. " आपले परस्परांवर प्रेम आहे, हे कित्येक दिवस दोघांनीही घरच्यांना सांगितले नव्हते. वसंतरावांनी एक दिवस ह्याबद्दल आपल्या वडलांना सांगितले व 'अशा बाबतीत मुलांनी आपले निर्णय स्वतःच घ्यायला हवेत' हे तत्त्वशः मान्य असल्याने माधवरावांनी लग्नाला संमती दिली. पण अडचण गलगलींकडून होती. त्या वेळी प्रमिला एकोणीस वर्षांची असल्याने व त्याकाळी मुलीचे लग्न लौकरच करायची प्रथा असल्याने साहजिकच गलगली तिच्यासाठी स्थळे शोधत होते. काही स्थळे सांगून येत होती व घरी त्यांची चर्चाही होत असे. अशीच एकदा एका स्थळाची चर्चा चालू असताना धीर करून प्रमिलाने आपले मन एकान्तात आईपाशी उघड केले. तिच्या मनात काय आहे हे आईने (म्हणजे इंदिराबाईंनी) आपल्या यजमानांना सांगितले; पण आप्पाण्णांना काही ती कल्पना पसंत पडली नाही. त्यांना एखादा वकील अथवा इंजिनिअर जावई म्हणून हवा होता. शिवाय मोठ्या मुलीचे, म्हणजे लीलाचे, लग्न पूर्वीच सखारामपंतांशी झाले होते व त्याच परिवारात दुसरी मुलगीही देणे तसे बहुसंमत नव्हते. साहजिकच आप्पाण्णांनी वसंतरावांचे नाव बाद करून टाकले. आप्पाण्णा मितभाषी होते व वकील असल्याने त्यांच्याशी वाद घालणेही अवघड होते; पण त्याच वेळी प्रमिलाचा हट्ट कायम होता. वसंत किंवा मग दुसरे कोणीच नाही. इंदिराबाईंची स्थिती खूप कोंडीत सापडल्यासारखी झाली. एकीकडे पतीचा वसंतला स्पष्ट विरोध आणि दुसरीकडे मुलीचे मन मात्र वसंतवर जडलेले! आपली अडचणीची परिस्थिती इंदिराबाईंनी रामराव हुक्केरीकर यांना एकदा सांगितली. हुक्केरीकर हे बेळगावचे एक प्रसिद्ध वकील होते आणि शिवाय ते राजकारणातही सक्रिय होते. पूर्वीच्या मुंबई ईलाख्यात जेव्हा पहिली बॉम्बे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली स्थापन झाली, तेव्हा हुक्केरीकर तिचे पहिले उपसभापती होते. विशेष म्हणजे ते गलगली कुटुंबाचे अगदी निकटचे स्नेही होते; त्यांचा शब्द आपले यजमान आप्पाण्णा मानतील, असे इंदिराबाईंना वाटले. प्रत्यक्षात तसेच घडले. काही दिवसांकरिता हुक्केरीकर पुण्याला राहायला आले होते व त्यांचा मुक्काम गलगलींच्या घरी होता. त्यांनी नातिचरामि | १८३ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२१७
Appearance