(आजीबरोबर) राहत होती. कारण हे होऊ द्यायचं नाही, हा तिचा आग्रह होता. असली सगळी चर्चा चालू असताना वसंतकाका तिथे आले. त्यांनी लगेच अगदी ठामपणे सांगितलं की, 'असलं काहीही होणार नाही. वहिनी आहेत तशाच राहतील.' आणि मग दहाव्या दिवशी न्हावी वगैरे आल्यावर शशीने त्या सर्वांना ठामपणे हाकलून लावलं ! "मी इंजिनिअर झाल्यावर प्रथम घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये ट्रेनिंगसाठी जात असे. एक दिवस किर्लोस्करांचे एक संचालक व आमचे गुणेकाका तिथे आले होते. वसंतकाका त्यांना म्हणाले, 'आमची मुलगी आता इंजिनिअर होऊन आली आहे. तुम्ही तिला किर्लोस्करवाडीला घेऊन जा. म्हणजे तिथे तिला सगळ्या प्रकारचं चांगलं ट्रेनिंग मिळेल.' त्याप्रमाणे नंतर एक वर्ष मी किर्लोस्करवाडीला जाऊन राहिले. त्यानंतर मोहन, दिलीप, उदय ह्या सर्वच मुलांना वसंतकाकांनी किर्लोस्करवाडीला ट्रेनिंगसाठी पाठवलं. ते नेहमी म्हणत, 'पुढे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा किंवा अन्य कुठे नोकरी करा; पण आपल्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती तुम्हांला असली पाहिजे आणि त्यासाठी एखाद्या मोठ्या कारखान्यात तुम्ही ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे.' " मी पुढे जेव्हा सांगलीला प्रकाशबरोबर आमची स्वतःची फौंड्री चालवायला लागले, तेव्हा त्यांना माझा खूप अभिमान वाटायचा. सर्वांना ते माझ्याबद्दल सांगायचे. नेहमी माझी आणि व्यवसायाची चौकशी करायचे. व्यवसायात काहीही अडचण आली, तरी ते लगेच मदत करायला पुढे होत. एकदा आमच्या व्यवसायात फौंड्रीत अत्यावश्यक असलेल्या कोलचा खूप तुटवडा होता. त्या वेळी कलकत्त्याचा एक व्यापारी घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये आला होता. त्यांचं काम संपल्यावर वसंतकाका त्याला म्हणाले, 'आमची मुलगी सांगलीला फौंड्री चालवते. तिलाही कोळसा लागतो. तिच्याकडे जाऊन तिला भेटा.' नंतर मलाही काकांनी फोन केला होता व त्यांच्याकडून कोळसा घ्यायला सांगितलं होतं.' 33 प्रभाताईचे यजमान प्रकाश म्हणजे सांगलीचे प्रसिद्ध उद्योगपती आणि राज्यसभेचे पंचवीस वर्षे खासदार राहिलेले आबासाहेब कुलकर्णी खेबूडकर यांचे चिरंजीव. त्यांच्याविषयी मागे लिहिलेलेच आहे. प्रकाशराव स्वतः एक यशस्वी उद्योगपती आहेत. ते म्हणतात, “आम्ही मूळ इचलकरंजीचे. गांधी हत्येनंतर झालेल्या दंग्यांचा आम्हांला फार मोठा धक्का बसला. आमचे घरदार जाळले गेले ते १० कुटुंबातले वसंतराव | १५१ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१८५
Appearance