१९६२ साली शिवाजी विद्यापीठ स्थापन झाल्यावर त्याचे ते पहिले सिनेट सदस्य होते. सखारामपंतांचे चिरंजीव व्यंकटेश ऊर्फ बाळ घाटगे म्हणतात, “वसंतकाका वाहतुकीच्या धंद्यात पडले ते तात्यांमुळे. बेळगावातील सामरा येथे तात्यांचं हवाई दलासाठी काही काम चाललं होतं. त्यासाठी मालाची बरीच ने-आण करावी लागे. त्यासाठी त्यांच्याकडे एक ट्रक होताच; पण त्यांना अजून एक ट्रक हवा होता. त्यांच्याच सांगण्यानुसार वसंतकाका आणि जयकुमारकाका यांनी ती व्यवस्था केली आणि पुढे त्यातूनच घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट कंपनी उभी राहिली. बेळगावचं काम करताना तात्यांनी भागीदारीत स्थापन केलेल्या घाटगे अँड पवार कंपनीने पुढे कोल्हापूर, विजापूर व होटगी इथेही काही बांधकामं केली. वसंतकाका आणि तात्या हे दोघेही भाऊ शेवटपर्यंत एकत्रच राहिले. तात्या १९७८ मध्ये वारले. वयाच्या साधारण ६८व्या वर्षी डायबिटीसचा त्यांना बराच त्रास होता. तसे अकालीच वारले म्हणायचे.' 33 नंतरचे भाऊ अमृतराव. त्यांना सगळे बापू म्हणत. १९३४ साली राजाराम कॉलेजातून प्राकृत आणि पाली हे विषय घेऊन ते एमए झाले; पण तेवढ्यावर समाधान न मानता १९३६ साली संस्कृत आणि इंग्लिश विषय घेऊन ते दुसऱ्यांदा एमए झाले. १९४० साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी संस्कृत भाषाशास्त्र ह्या विषयात पीएच.डी. पूर्ण केली. १९५६-५७ साली रॉकफेलर फौंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेत युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिलव्हेनियामध्ये गेले व तिथे त्यांनी भाषाशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास केला. घरात त्यांची एक अभ्यासिका होती. तिच्या सगळ्या भिंती खालपासून वरपर्यंत पुस्तकांच्या कपाटांनी झाकलेल्या होत्या व अमृतराव वाचनात आणि चिंतनात सदैव मग्न असत. सखारामपंत आणि वसंतकाका हे दोघे भाऊ त्यांच्या व्यवसायांमुळे कायम घराबाहेर असत व ह्याउलट अमृतराव कॉलेज सोडले, तर उरलेला सगळा वेळ घरातच असत. स्वभावानेही ते खूप सौम्य, शांत होते. त्यामुळे बहुधा पुढच्या पिढीचे त्यांच्याशी तुलनेने अधिक सख्य असायचे. पुढे अमृतराव नोकरीनिमित्त कोल्हापूर सोडून आथी थारवाडला आणि नंतर पुण्याला गेले; तिथल्या डेक्कन कॉलेजात संस्कृत शिकवू लागले. पुढे ते कॉलेजचे डायरेक्टरही बनले. भाषातज्ज्ञ म्हणून अखिल भारतीय पातळीवर नावारूपाला आले. मराठी, हिंदी, इंग्रजी, जर्मन, वसंतवैभव | १४६ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१८०
Appearance