या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
UDA प्रकरण ६ कुटुंबातले वसंतराव आपापल्या व्यवसायक्षेत्रात माणूस कितीही मोठा आणि कार्यमग्न असला, तरी त्याच्या आयुष्याचा बराचसा भाग हा त्याच्या कुटुंबीयांसोबत व्यतीत होत असतो. त्याचे कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. वसंतरावांच्या चरित्राचा विचार करताना कुटुंबातले वसंतराव कसे होते, हे समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. पहिल्या प्रकरणात लिहिल्याप्रमाणे हसूरचंपू सोडून कोल्हापूरला आल्यानंतर १९३२ ते १९६२ घाटगे कुटुंब एकत्र राहत होते. ह्या तीस वर्षांनंतर १९६२ ते १९६७ ह्या कालावधीत वसंतराव आणि त्यांचे कुटुंब नितीन निवासमध्ये स्वतंत्ररीत्या राहायला लागले. नितीन निवास ही कुटुंबातले वसंतराव | १४१ |