भ्रष्टाचाराच्या संदर्भात मुलाखतीच्या शेवटाला वसंतराव म्हणतात, " कर आकारणीचे दर भरमसाट वाढले आहेत. इतके भरमसाट, की कर भरण्यापेक्षा कर चुकवण्याची जोखीम स्वीकारणे अधिक फायदेशीर वाटते. या स्वाभाविक प्रवृत्तीमुळे कर चुकवणे, काळाबाजार करणे, काळा पैसा मिळवणे व स्मगलिंग करणे हे सर्व काळे व्यवहार करणेच फायद्याचे आहे ; प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करणे फायद्याचे नाही, अशी जाणीव निर्माण झाली आहे. फायद्यासाठी हे सर्व काळे व्यवहार करण्याची जोखीम पत्करल्यामुळे भ्रष्टाचारालाही साहजिकच ऊत आला आहे. सरकारचे मूलभूत धोरण ह्याला जबाबदार आहे. या समस्येवर एखादा निश्चित उप सांगणे कठीण आहे. कारण अशा राष्ट्रीय अनवस्थेला एखादा रामबाण उपाय असूच शकत नाही. यातून मार्ग काढणे ही संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे. राष्ट्रीय उद्दिष्टांसाठी बहुसंख्य समाजाने काय करायचे ते ठरवले व राष्ट्रीय उत्थापनासाठी सर्व समाजच जागा झाला आणि प्रवण झाला, तर राष्ट्राची प्रगती निश्चित आणि द्रुतगतीने होईल.” सामाजिक जीवनातील वसंतरावांच्या सहभागाबद्दल आज विचार करताना जाणवते, की आपल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ न देता जेवढे समाजासाठी करता येईल तेवढे वसंतराव सातत्याने करत आले. एखाद्या अन्य सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचा त्यांचा पिंड नव्हता. शिवाय आपला व्यवसाय सोडून अन्य काही करण्यात आपला वेळ व श्रम खर्च करणे त्यांना पटणारे नव्हते. 'स्वथर्मे निधनं श्रेयः परथर्मो भयावह: ' हे गीतावचन ह्या संदर्भात सहज आठवते. पण आपला व्यवसाय मात्र वसंतरावांनी आपले सर्वस्व पणाला केला. त्यात कधीही कुठलीही हयगय केली नाही. आपले व्यावसायिक काम आपण उत्तम प्रकारे करणे हीदेखील मोठीच समाजसेवा आहे ही बहुधा त्यांची धारणा असावी. 'योगः कर्मसु कौशलम्' हे गीतावचनही ह्याच भावनेशी जोडलेले आहे. व्यवसाय आणि समाज | १३९ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१४१
Appearance