या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
ह्या संस्थेचे श्री. अनंत / शिरीष आणि त्यांचे कुशल सहकारी ह्यांना, तसेच उत्तम छपाईसाठी कलायडो ग्राफिक्सचे श्री. श्रीनिवास आणि सौ. मेथा वीरकर यांनाही धन्यवाद देतो. ह्या चरित्राच्या संदर्भात वसंतकाकांवर प्रेम करणारे त्यांचे अनेक सहकारी, मित्र आणि नातेवाईक यांच्याशी पुनःपुन्हा चर्चा करण्याचा योग आला व त्यानिमित्ताने माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी जागवता आल्या. त्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे चरित्र जे वाचतील त्या सर्वांना त्यातून स्वतःच्या आयुष्यात काही ना काही उत्तम घडवण्याची प्रेरणा मिळो ही सदिच्छा. वसंतवैभव । १२ । - मोहन घाटगे विश्वस्त, वसंतराव घाटगे मेमोरियल ट्रस्ट