Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांच्याकडे काम करणारे प्रभाकर कुलकर्णी हे वसंतरावांच्या रोजच्या बैठकीतले. पुढे त्यांच्या पब्लिसिटीबरोबर घाटगे-पाटलांचे व्यावसायिक संबंधही जोडले गेले. दैनिक सत्यवादी, दैनिक पुढारी आणि दैनिक समाज ही त्या काळातली कोल्हापुरातील प्रमुख वृत्तपत्रे होती व त्यांचे मालक-संपादक अनुक्रमे बाळासाहेब पाटील, गणपतराव जाधव आणि सर्जेराव पाटील यांच्याशी वसंतरावांचे जवळचे संबंध होते. हे संबंध कसे होते ह्याची एक झलक म्हणजे राम कर्णिक यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेला एक प्रसंग. कर्णिक लिहितात, “माझं लग्न ठरलं तेव्हा दै. सत्यवादीचे मालक-संपादक बाळासाहेब पाटील यांनी एके दिवशी मला फोन करून त्यांच्या ऑफिसात बोलावलं. मी गेलो. घाटगे, पाटील आणि आणखीही काही नामवंत मंडळी त्याच वेळी आलेली मी बघितली. हॉलमध्ये चहापानाची व्यवस्था होती. आलेल्या मंडळींनी प्रयोजन विचारलं तेव्हा बाळासाहेब म्हणाले, 'आज रामना केळवण आहे. ' 333 एखाद्या कंपनीच्या अधिकाऱ्याचे लग्न ठरल्याचे कळल्यावर, स्वतःहून त्याचे केळवण करावेसे एखाद्या वृत्तपत्राच्या मालक-संपादकाला वाटणे, तेही त्या अधिकाऱ्याला 'सरप्राईज' म्हणून करण्याइतपत त्यांच्या नात्यात अनौपचारिकता असणे, आणि त्यासाठी त्या मालक-संपादकाने इतक्या सगळ्या मंडळींना बोलवायचा घाट घालणे ह्या साऱ्यातून दिसणारे प्रेम आणि जवळकीची भावना आजच्या व्यावसायिक जीवनात दिसणे जवळजवळ अशक्यच आहे. वसंतरावांना क्रिकेटची खूप आवड होती. कोल्हापुरात कसोटी सामने काही होत नसत; पण रणजी ट्रॉफीचे सामने होत. ते बघायला वसंतराव नेहमी जात. बरोबर इतरांनाही घेऊन जात. त्याकाळी कोल्हापुरात स्टेडियम नव्हते, प्रेक्षकांसाठी तंबू असत. तिथे घाटगे-पाटलांच्या काही खुर्च्या कायम रिझर्व केलेल्या असत. सामना बघताना वसंतराव अगदी समरस होऊन जात; इतके की एका मित्राच्या आठवणीनुसार ते बाउन्ड्री लाईनवर फिल्डिंग करणा-या फिल्डरशी कथीकथी बोलायचेसुद्धा! एकदा भारतीय कसोटी क्रिकेट संघ एका महोत्सवी सामन्यासाठी कोल्हापुरात आला असताना सर्व खेळाडूंचा घाटगे-पाटील कंपनीच्या वतीने खास व्यवसाय आणि समाज | १३५ ।