Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रिफाइन्ड ऑईल बनवण्याचा हा प्रक्रिया उद्योग होता. जिरायत शेती करणाऱ्या शेतकऱ्याला हे मोठेच वरदान होते; भुईमूग हेच त्याचे पारंपरिक पीक होते. राजकीय नेत्याचे सहकार्य असेल, तर उद्योजक विकासकामात कसे मोठे योगदान देऊ शकतो याचे ही संस्था म्हणजे उत्तम उदाहरण होते. १९६७ साली आबासाहेब काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीला गेले. पुढची सलग २५ वर्षे ते राज्यसभेत होते. त्याकाळात सहकारी चळवळीचे, तसेच यंत्रमाग कारखानदारीचे हित त्यांनी काळजीपूर्वक जपले. इचलकरंजी ही यंत्रमाग व्यवसायाची राजधानी. या यंत्रमाग व्यवसायाला पूर्वी सरकारी पाठबळ फारसे नसायचे. किंबहुना महात्मा गांधींच्या प्रभावामुळे हातमागाला सर्वतोपरी उत्तेजन द्यायचे सरकारचे धोरण होते व यंत्रमाग चालवणे हा हातमागाच्या विरोधात असलेला व्यवसाय आहे, असाच गैरसमज अनेकांचा होता. तो सरकारी पातळीवर दूर करण्याचे व यंत्रमाग व्यवसायाचे अनेक प्रश्न सोडण्याचे कामही आबासाहेबांनी निष्ठेने केले. आबासाहेबांचा व घाटगे परिवाराचा परिचय पूर्वीपासूनच होता. सुरुवातीला त्यांचा स्नेह सखारामपंतांशी अधिक होता, दोघे वर्गमित्रच होते; पण मग सगळेच घाटगे कुटुंबीय त्यांचे मित्र बनले. दोन्ही परिवारांचे एकमेकांच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. सखारामपंतांच्या कन्या प्रभाताई ह्या सांगली येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्याही आबासाहेबांच्या घरी जात येत असत. पुढे १९६७ साली आबासाहेबांचे चिरंजीव प्रकाश यांच्याशी त्यांचे लग्न झाले. दोन्ही कुटुंबांतील मैत्रीला नात्याची घट्ट जोड मिळाली. त्यांचे चिरंजीव प्रकाशराव लिहितात, “आबासाहेबांचं वेगळेपण त्यांच्या स्पष्टवक्तेपणात होतं. राजकारणाची वाटचाल सुरळीत आणि लोकहिताची नसेल, तर अशा वेळी स्पष्टपणे बोलणारा नेता राजकारणात असावा लागतो. कुणाचीही भीडभाड न ठेवता लोकहितासाठी त्यानं निर्भयपणाने बोलणं, चुका दाखवून देणं गरजेचं असतं. हे व्रत आबासाहेबांनी निष्ठेनं सांभाळलं. यातच त्यांचं सारं मोठेपण सामावलं आहे." (आबासाहेब, १९९३ साली आबासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी प्रकाशित केलेला स्मृतिग्रंथ, पृष्ठ २९२) प्रकाशरावांनी स्वतः पुढे कुलकर्णी इंजिनिअरिंग ही कंपनी काढली. ते मुंबईच्या प्रख्यात VITIचे टेक्स्टाईल इंजिनिअर. पण ते क्षेत्र मोठ्या प्रमाणावर सरकार - नियंत्रित असल्याने प्रकाशरावांनी स्वतःकरिता वेगळी व्यवसाय आणि समाज | १२९ ।